घरगुती किचन टिप्स

🎯 घरगुती किचन टिप्स

👉 तांदूळ शिजवताना लिंबाचा रस घाला. भात पांढरा होतो

👉 पुलाव करताना संत्र्याच्या सालीचं चूर्ण मिसळा. यामुळे पुलावला सुगंध प्राप्त होतो.

👉 सॅलेड बनवण्याआधी भाज्या आणि फळं फ्रीजमध्ये ठेवा. मनासारख्या आकारात कापता येईल.

👉 रस्सा दाट, स्वादिष्ट होण्यासाठी दाण्याचं कूट, नारळाचा चव मिक्सरला करून रश्श्यात घालावा.

👉 कुठलीही भाजी कमी पाण्यात शिजवावी, चविष्ट होते.

👉 भांडय़ाला कांद्याचा वास लागला असेल तर थोडा वेळ मिठाच्या पाण्यात घालून ठेवावं.

👉 टोमॅटो कापताना सुरीला किंवा विळीला तेल लावल्यावर भराभर कापला जातो. बारीक फोडी हव्या असतील तर आतील बाजूने कापावा.

👉 सॅलेडच्या भाज्या चिरताना बर्फाच्या पाण्यात घालून ठेवा म्हणजे भाज्या ताज्या राहतील.

👉 उकडलेले बटाटे सोलताना सालासकट त्याचे चार तुकडे सुरीने करा. घाईच्या वेळेस बटाटे लवकर थंड होऊन सोलले जातील.

👉 अळूची पातळ भाजी करताना पानांचे तुकडे करुन मिक्सरमध्ये फिरवून घ्यावेत म्हणजे भाजी चांगली होते.

👉 व्हेजिटेबल सूप उकळताना चमचाभर मिल्क पावडर सुपात घातल्यास मळी दूर होऊन, स्वच्छ नितळ सूप तयार होते.

👉 कोबीची भाजी करताना, चिरुन झाल्यावर धुऊन मीठ लावून ठेवावे. त्यामुळे कोबी चटकन शिजतो व उग्र वास येत नाही.

👉 हरभरा सोलण्याचे काम चटकन उरकण्यासाठी निर्लेप कात्रीने हरभरा दोन्हीकडून थोडा-थोडा छाटावा. दाणा चटकन बाहेर पडतो.

👉 अळूची पाने खाजरी असतील तर प्रथम ती पाने धुवावीत नंतर एका पसरट भांडय़ात पाणी घेऊन त्यात लिंबू पिळावे. 10-15 मिनिटे तसेच ठेवावे. अळूची पाने चाळणीत निथळून घ्यावीत म्हणजे खाज कमी होईल.

👉 कोणत्याही रेसिपीमध्ये पनीर वापरायचे असल्यास आधी उकळलेल्या गरम पाण्यात थोडं मीठ घालून पनीरचे क्यूब्ज 10 ते 15 मिनिटे टाकून ठेवा. नंतर निथरून वापरा. पनीर अगदी सॉफ्ट लागेल. दीर्घकाळासाठी पनीर ताजं ठेवायचं असेल तर ते ब्लॉटिंगपेपरमध्ये गुंडाळून मग फ्रीजमध्ये ठेवावं.

👉 मंद आचेवर दूध तापवताना त्यात एक चमचा किंवा जास्त दूध असल्यास एक बशी बुडवून ठेवल्याने दूध पातेल्याला चिकटत नाही. दूध उकळल्यावर त्यात एक चमचा सोडियम बायकाबरेनेट घातल्याने दूध नासत नाही.

Comments

Popular posts from this blog

समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.

मूलगीची तक्रार - कविता

शिवजयंती तिथीप्रमाणे का ?