मास्तरांची कर्ज कहानी
🌾🌾मास्तरांची कर्ज कहानी🌾🌾
नऊ लाख डोनेशन
देणे कबुल झाले
हातात खडु घेवुन
मास्तर रूजु झाले ! ....🖋
घरातल्या घरात
भांड्याला भांड थटु लागलं
माय लेकरांचे प्रेम
दुधासारखं अटु लागलं
सासु -सासऱ्याशी पटेना
मॅडम म्हाणाल्या वेगळं राहु
चार गुंठे , फ्लॅट
हपत्या हपत्या घेवू !
सोसायटीचे दहा लाख
पंचवीस लाख गृह कर्ज
रंग-रंगोटीसाठी
पुन्हा पतसंस्थेत अर्ज !
इतका देखणा बंगला
साधी पुजा चालेल कशी
नात्यागोत्यांच्या नाकावर
बसु नये माशी !
चार चाकीशिवाय
बंगला काय शोभत नाही
थोडे कर्ज वाढले म्हणून
बंगलाकाय डुबत नाही
आंधळा विचार मॅडमचा
कसा दिसेल धोका
ताटाखालच्या मांजराचा
झालाच नाही बोका !
बघता बघता घरात
तिनदा हलला पाळणा
चुकला हिशोब खर्चाचा
घेतला नाही खेळणा !
व्याज, हप्ता, कर्ज
गणित काय जमेना
मास्तराच मन
वर्गात सुध्दा रमेना !
उपवर मुलगी लग्नाची
पुन्हा झुकली मान
सोयऱ्यासाठी पायपिट
फाटून गेली वहान !
" आज मास्तर सेवा निवृत्त"
कर्ज फेडण्यात गेली हयात
आज साठी गाठली
पोरांनी हळूच
रक्कम फंडाची लाटली !
सुख समाधान शांतीसाठी
देवळात जावून बसतात
काय कमावले आयुष्यात
हिशोब करत असतात !
मांडीवर घेऊन नातवाला
मास्तर सांगे कहाणी
एका डोळ्यांत हासु
दूसऱ्या डोळ्यांत पाणी!
🌹 कविता छान वाटली तर शेअर करा🌹
Comments
Post a Comment