अभ्यासक्रमांची शास्त्रीय नावे

👉 अभ्यासक्रमांची शास्त्रीय नावे

आपल्याला अनेक विषयांची फक्त मराठीतून नावे माहिती असतात. शास्त्रीय भाषेत त्याला काय म्हणतात हे आपल्याला माहिती नसते. म्हणून कोणत्या विषयाच्या अभ्यासाला शास्त्रीय भाषेत काय म्हणतात त्याबद्दल थोडस जाणून घेऊयात...

👉 ध्वनींचा अभ्यास - अॅकॉस्टिक्स

👉 ग्रह-ताऱ्यांचा अभ्यास - अॅस्ट्रॉनॉमी

👉 वनस्पती जीवनांचा अभ्यास - बॉटनी

👉 हवामानाचा अभ्यास - मीटिअरॉलॉजी

👉 रोग व आजार यांचा अभ्यास - पॅथॉलॉजी

👉 कीटकजीवनाचा अभ्यास - एन्टॉमॉलॉजी

👉 धातूंचा अभ्यास - मेटलर्जी

👉 मानवी वर्तनाचा अभ्यास  - सायकॉलॉजी

👉 प्राणी जीवांचा अभ्यास - झूलॉजी

👉 पृथ्वीच्या पृष्ठ भागावरील पदार्थांचा अभ्यास - जिऑलॉजी

👉 ह्रदय व त्यांची कार्ये यांच्याशी संबंधीत शास्त्र - कार्डिऑलॉजी

👉 अवकाश प्रवासशास्त्र - अॅस्ट्रॉनॉटिक्स

👉 प्राणी शरीर शास्त्र - अॅनाटॉमी

👉 मानववंशशास्त्र (मानव जातीचा अभ्यास) - अँथ्रापॉलॉजी

👉 जीव-रसायनशास्त्र - बायोकेमिस्ट्री

👉 सजीवासंबंधीचा अभ्यास (जीवशास्त्र) - बायोलॉजी

👉 शरीर-इंद्रिय-विज्ञानशास्त्र - फिजिअॉलॉजी

👉 फलोत्पादनशास्त्र - पॉमॉलॉजी

👉 मृतप्राणी भूसा भरून ठेवण्याचा शास्त्र - टॅक्सीडर्मी

👉 भूपृष्ठांचा अभ्यास - टॉपोग्राफी

👉 रंगविज्ञानाचे शास्त्र - क्रोमॅटिक्स

👉 विविध मानववंशासंबंधीचा अभ्यास - एथ्नॉलॉजी

👉 उद्यानरोपन, संवर्धन व व्यवस्थापन यांचे शास्त्र - हॉर्टिकल्चर

👉 भूगर्भातील पदार्थांचा (खनिज वगैरे) अभ्यास - मिनरॉलॉजी

👉 जिवाणूंचा अभ्यास - बॅक्टेरिओलॉजी

👉 विषाणूंचा अभ्यास - व्हायरॉलॉजी

👉 हवाई उड्डाणाचे शास्त्र - एअरॉनाटिक्स

👉 पक्षी जीवनाचा अभ्यास - ऑर्निथॉलॉजी

👉 सरपटणाऱ्या प्राण्यांचे शास्त्र - हर्पेटलॉलॉजी

👉 अनुवांशिकतेचा अभ्यास - जेनेटिक्स

👉 मज्जासंस्थेसंबंधीचा अभ्यास - न्यूरॉलॉजी

👉 विषासंबंधीचा अभ्यास - टॉक्सिकॉलॉजी

Comments

Popular posts from this blog

समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.

मूलगीची तक्रार - कविता

शिवजयंती तिथीप्रमाणे का ?