Kitchen Tips

Kitchen Tips :

उन्हाळ्यात अन्न टिकवण्यासाठी काय घ्यावी काळजी ?

👉 अन्न नेहमी हवाबंद डब्यातच साठवून ठेवा. उष्णता, हवा आणि दमटपणापासून अन्न दूर ठेवा.

👉 न चिरलेल्या भाज्या उघड्यावर ठेवल्यास त्यातली पोषकद्रव्ये, महत्त्वाची जीवनसत्त्वे नष्ट होतात. परिणामी भाज्या फ्रिजमध्ये ठेवताना हवाबंद डब्यात ठेवा.

👉 शिजवलेले मांस हवाबंद डब्यात ठेवल्यास चार ते पाच दिवस फ्रिजमध्ये अगदी सहज टिकतं.

👉 कच्च मांस साठवायचं असेल तर ते हवाबंद डब्यात घालून फ्रिजरमध्ये ठेवा. शिजवण्याआधी काही काळ फ्रिजबाहेर काढून ठेवा.

👉 उन्हाळ्यात फळं लवकर खराब होतात. त्यामुळे ती न धुता फ्रिजमध्ये ठेवा. तीन ते चार दिवस अगदी सहज टिकतील.

👉 उरलेला ब्रेड खराब होऊ नये यासाठी हवाबंद डब्यात फ्रिझरमध्ये ठेवा. खाण्याच्या १५ मिनिटे आधी तो बाहेर काढून ठेवा. ओव्हनमध्ये गरम केल्यास ब्रेड छान लुसलुशीत होईल.

👉 ताजे मासे एखादा-दुसरा दिवस फ्रिजमध्ये टिकतात. मासे जास्त काळ साठवून ठेवायचे असतील तर हवाबंद डब्यातच ठेवा.

👉 आंब्यांचा मौसम सुरू होत आहे. आंब्याचा रस काढून हवाबंद डब्यात साठवून ठेवा. हा रस अगदी कधीही काढून खाता येईल.

इतर काही महत्वाच्या टिप्स

👉  भेंडीची भाजी करताना त्यात दही घातल्याने भाजी चिकट होत नाही

👉 जास्त लिंबाच्या रसासाठी पाच ते दहा मिनिटं लिंबू कोमट पाण्यात भिजवावं.

👉 सुकं खोबरं तुरडाळीत ठेवलं तर खराब होत नाही

👉 फळभाज्या मऊ किंवा शिळ्या झाल्यास रात्रभर मिठाच्या पाण्यात घालून ठेवल्याने टवटवीत होतात.

👉 शेंगदाणे भाजून झाल्यावर त्यात मीठ टाकल्याने साल लवकर निघतात.

👉 साखर मुंग्यांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी त्यात चार ते पाच लवंग ठेवाव्यात.

👉 भजीच्या पीठामध्ये मक्याचं पीठ घातल्याने भजी कुरकुरीत होतात.

👉 कच्ची केळी ठंड पाण्यात ठेवल्याने आठवडाभर टवटवीत राहतात.

👉तांदूळ पाण्यात भिजवून ठेवला तर तांदळाचा दाणा मोकळा आणि मोठा होतो.

👉 भाज्यांमध्ये मीठ शेवटी घातल्यास भाजीतलं मीठ टिकून राहतं.

👉 तुरीच्या डाळीत हिंग ठेवल्यास हिंगाचा वास टिकून राहतो.

👉 डाळ किंवा तांदळामध्ये कडूनिंब घातल्यास त्याला किड लागत नाही.

👉 चिमटीभर हळद बटाट्यांमध्ये घातल्यास ते लवकर उकडतात.

👉 पुऱ्यांच्या कणकेत साखर घातली तर पुऱ्या बराच वेळ फुगलेल्या राहतात.

👉 लिंबाच्या रसाचे डाग घालवण्यासाठी त्यावर आल्याचा तुकडा घासावा.

👉 पालेभाज्या सुकल्यावर पाण्यात व्हिनेगर किंवा लिंबाचा रस घालून ठेवल्यास भाज्या ताज्या होतात.

👉 कोफ्टा किंवा इतर पदार्थ तेलात तळताना थोडं मिठ घालावं. जेणे करून तेल त्या पदार्थात सोसलं जात नाही.

👉 कडुनिंब शिल्लक असल्यास तो तळून डब्यात भरून ठेवल्याने जास्त काळ टिकतो.

Comments

Popular posts from this blog

समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.

मूलगीची तक्रार - कविता

शिवजयंती तिथीप्रमाणे का ?