THEN & NOW: प्रेम, प्रपोज आणि बरंच काही...

THEN & NOW: प्रेम, प्रपोज आणि बरंच काही...

या एका शब्दाची संकल्पना, त्याच्या व्याख्या जशा पद्धतीने घ्याल तशा त्या तुम्हाला उमगतील. कारण, प्रपोजच्या संकल्पना गेल्या काही वर्षांमध्ये अशा काही बदलल्या आहेत की विचारुन सोय नाही. त्या दिवशी सहज लोकलची वाट पाहताना एक विचार मनात आला. विचार म्हणण्यापेक्षा कोणाची तरी आठवण झाली. त्या आठवणीसोबत बाजारात जसे एकावर एक फ्री डबे मिळतात, तसेच काहीसे विचारही मिळाले. आठवणींवर विचार फ्री… कसली भारी ऑफर आहे ना?

पण, खरंच ही ऑफर प्रेमाच्या वळणावर येते ना तेव्हा मनात काही वेगळ्याच लहरी उठतात. अर्थात प्रत्येकाच्या मनात त्या लहरी कमी जास्त प्रमाणात असतात. पण, असतात खऱ्या. त्याच लहरी एखाद्या जिव्हाळ्याच्या व्यक्तीकडे व्यक्त करण्याच्या संकल्पनेला प्रपोज असं नाव दिलं आणि सुरु झाला नवा ट्रेंड, प्रपोजचा. खरंतर प्रपोज करण्याच्या आजच्या संकल्पना आपण रोजच्या आयुष्यात पाहतो. पण, गतकाळातही प्रेम व्यक्त करण्यासाठी काही कलात्मक आणि सुरेख मार्गांचा वापर केला जायचा. अर्थात, तेव्हा त्याला प्रपोज वगैरे असे टॅग लावण्यात आले नव्हते.

पुराणकथांमध्ये असणारे उल्लेख असोत किंवा मग काळानुरुप होणाऱ्या बदलांनुसार चित्रपटांच्या माध्यमातून प्रेम व्यक्त करण्याच्या पद्धतींचा खजिना असो, ते व्यक्त होणंच फार महत्त्वाचं.

एक काळ असा होता जेव्हा प्रपोज करण्यासाठी, कोणा एका व्यक्तीप्रती असणाऱ्या भावना त्याच व्यक्तीसमोर ठेवण्यासाठी शब्दांची गुंफण करत चारोळ्या किंवा सुरेख कविता केल्या जायच्या. शाळेच्या एका दुसऱ्या वर्गात ‘ती’ असेल तर कागदाच्या बोळ्यात ती कविता लिहून तो बोळा त्या वर्गात फेकायचा, किंवा तिच्या कोणा मैत्रिणीला गाठून हा भावनांचा ठेवा तिच्यापर्यंत पोहोचवायची सोय करायची. बरं हे फक्त ‘तो’ तिच्यासाठी करायचा असंच नाही. काहीजणीसुद्धा हे धाडसी पाऊल उचलायच्या. पण, तो काळ असा होता जिथे तुलनेने तीचं व्यक्त होणं तसं कमीच होतं. शाळेत असणाऱ्या तिच्या घरचा पत्ता ठाऊक असेल तर तिच्या घरापाशी येरझऱ्या घालणारे अनेक प्रेमवेडे मित्र आपल्याला भेटतील. अर्थात आता त्यांची वयं मात्र वाढली असतील हे खरं. एखादा गजरा किंवा तिच्या आवडीचं पुस्तक देऊन प्रेमाची कबुली देणारेही तेव्हा बरेच होते. ती मात्र प्रेम व्यक्त करण्यासाठी शब्दांचा आणि गाण्यांचा आधार घ्यायची. गाणी, शब्द, सूर यांची सुरेख उधळण.

नजरेतून प्रेम व्यक्त करण्याची पारी ओलांडल्यानंतर थेट आपल्या भावना त्या एका व्यक्तीपर्यंत कशा बरं पोहोचवायच्या असा प्रश्न त्या काळात तसा फार कमीच उद्भवला असावा. कारण, साहिर लुधियानवी, प्रदीप, शकील बदायुनी, कैफी आझमी, शैलेन्द्र यांच्या शब्दांची आणि त्यांच्या कल्पनाविश्वातून साकारलेल्या कवितांची साथ जणू या प्रेमी युगुलांना मिळाली होती. ये मेरा प्रेम पत्र पढकर, के तूम नाराज ना होना…. या ओळी कानावर पडल्या की काय सुरेख काळ होता तो याचा अंदाज येतो. किंवा मग लिखे जो खत तुम्हे… आठवलं की कसली रोमॅन्टिक पिढी होती ती याचा अंदाज आल्यावाचून राहत नाही. गुलाबाची फुलं, कविता, एखादी सुरेख साडी, गजरा, नजरानजर आणि त्यात ओसंडून वाहणारं प्रेम या अशा अंदाजात व्यक्त व्हायची त्या काळची मंडळी. म्हणूनच का त्यांच्या प्रेमाचा बहर आजही मनावर हलकीशी फुंकर घालून जातो? असो.. ये हुई गुजरे जमानेकी बाते… मियाँ अब थोडा इन दिनों की ओर रुख करे..

आज प्रेम या शब्दावरील श्रद्धा जरा कमी झाली असं जुनी मंडळी म्हणतात. आमच्या काळात असं नव्हतं हा टॅग ते ज्या अनेक गोष्टींना लावतात त्या गोष्टींच्या यादीमध्ये ‘प्रेम’ही आहेच. म्हणजे आम्ही कसं पुस्तकातून लव्ह लेटर द्यायचो या आजी-आजोबांच्या काळापासून ते पीसीओच्या फोनवर वीस रुपयांचे कॉइन घेऊन बाबांनी आईशी मारलेल्या प्रेमगप्पा, असा तो प्रेम व्यक्त करण्याचा प्रवास ऐकायला मिळाला असणार. मात्र त्यांच्या नजरेतून हा प्रवास ‘ऐकताना’ (मुद्दाम पाहताना नाही म्हणत आहे कारण आज आपल्याला तंत्रज्ञानामुळे इतकं रोमॅन्टिक काही पाहता येत नाही. पाच इंचाच्या पडद्यामुळे कल्पनाशक्तीला मर्यादा आल्यात म्हणा हवं तर) तर हा प्रवास ऐकण्याचा वेगळाच आनंद असतो. तुम्ही तो अनुभवला नसेल तर मुद्दाम एखाद्या संध्याकाळी आजी-आजोबा किंवा आई-बाबांबरोबर वाफाळत्या चहाच्या कपबरोबर या विषयावर ‘चाय पे चर्चा’ घडवून आणाच.

आज आपण अगदी सहज प्रेम व्यक्त करतो आणि आधी अनेक पर्याय होते. प्रेम व्यक्त करण्यासाठी मात्र आज तंत्रज्ञान या एकाच दृष्टीतून आपण प्रेम व्यक्त करण्याला प्राधान्य देतो. म्हणजे अगदी व्हॉट्सअपवरील संवादातील आय लव्ह यू किंवा १४३ असो अथवा फोन ठेवताना कधीतरी फॉरमॅलिटी म्हणून म्हटलेलं आय लव्ह यू. आपलं प्रेम ना असं तंत्रज्ञानाभोवती फिरतंय. म्हणजे मोबाईल फोन किंवा इतर समाजमाध्यमे आपल्या प्रेम संवादाचा गाभा झाले आहेत. यात चूक काहीच नाही मात्र असे अनेक कपल्स आपण पाहतो जे सतत फोनवर त्याच्याशी किंवा तिच्याशी बोलत असतात किंवा चॅट करत असतात आणि मग फोनची इतकी सवय होते की प्रत्यक्षात ते दोघे भेटल्यावर ते कोणत्या तरी तिसऱ्या व्यक्तीबरोबरच फोनवर असतात. म्हणजे डेटवर गेल्यावर ती त्याच्यासमोर बसून गप्पा मारतेय आणि तो फोनमध्ये पाहत असतोय असं किती तरी कॉफी शॉपमध्ये दिसतं आज काल नाही का?

प्रेमाच्या व्याख्या खूप बदलल्या आहेत आज. हल्ली व्हॉट्सअपवरील एका लव्ह यू ने प्रेमकहाण्या सुरु होतात आणि आय थींक वी शूड ब्रेक अप म्हणत संपतात. या दरम्यान, बाबू, शोनू, बच्चा असं काय काय ते सगळं दिसतं चॅट हिस्ट्रीमध्ये. पण जशी या तंत्रज्ञानामुळे मने पटकन जुळतात तसंच कंटाळा आला की हो बरोबर वाचलंत तुम्ही कंटाळा आली की ब्रेकअप करतात. इतकं सोप्प झालंय आज अनेकांसाठी. प्रेमवीर आणि प्रेमविरांगनांव्यतिरिक्त रोजच्या संवादात आपण सहज एकमेकांना लव्ह यू किंवा किसवाले इमोजी पाठवतो. म्हणजे अनेकांच्या फोनमध्ये त्यांच्या जवळच्या मैत्रिणीला पाठवलेले किसींग इमोजी किंवा हार्ट इमोजी असतील. मग कधीतरी आई-बाबांनी ते चॅट चुकून पाहिलेच की ठरलेलं उत्तर, ‘बाबा ते खूप कॅज्युअली होतं. मी माझ्या मैत्रिणीवर प्रेम नाही करु शकत का? आपण मुलगा आणि मुलीमध्ये त्या एकाच नात्याने किती दशके बघणार आहोत

__________________________________________
माहिती संकलन: स्वप्निल आव्हाड, माळवाडी, सिन्नर.

Comments

Popular posts from this blog

शिवजयंती तिथीप्रमाणे का ?

लेख: आश्विन अमावास्येस लक्ष्मीपूजन हा सण साजरा केला जातो.

समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.