विमानात बसल्यावर मोबाईल Airplane Mode वर का सेट करावा लागतो?

Tech Knowledge : विमानात बसल्यावर मोबाईल Airplane Mode वर का सेट करावा लागतो?

आजकाल कुठेही गेलात की तुम्हाला Data किंवा Wifi ची नितांत आवश्यकता असते, जेणेकरून तुम्ही फेसबुकवर काही वेळ घालवू शकता. काही लेटेस्ट न्यूज पाहू शकता, जगभरातील अपडेट मिळवू शकता आणी खूपच कंटाळा आला तर ऑनलाईन मुव्हीज पाहू शकता किंवा म्युजिक ऐकू शकता. पण विमानात बसल्यावर मात्र या सर्व गोष्टींना मुकावं लागतं.

आजही विमानामध्ये बसल्यावर तुमच्याजवळ असलेले सर्व इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस तुम्हाला एकतर बंद करावे लागतात किंवा Airplane Mode वर सेट करावे लागतात. तसा नियमच आहे आणि त्या नियमाचे प्रत्येक प्रवाश्याला पालन करावेच लागते. त्यामुळे Data काय किंवा Wifi काय कशाचाच वापर करता येत नाही. (आतासं कुठे काही विमान कंपन्यांनी विमानात Wifi देण्यास सुरुवात केली आहे.)

अश्या वेळी मनात प्रश्न येतो की तंत्रज्ञान एवढ सुधारलंय, फ्लाईट टेक्नोलॉजी अतिशय प्रगत झाली आहे, मग तरीही अजून या Airplane Mode वर उपाय का निघत नाही? मोबाईल जर Airplane Mode वर नाही ठेवला तर कुठे बिघडतं? चला तर आज या प्रश्नामागचं उत्तर आज जाणून घेऊया.

खरतरं ही गोष्ट प्रवाश्यांच्या सुरक्षेसाठी अतिशय महत्त्वाची आहे. एक असा समज होता की मोबाईल सुरु ठेवल्यास त्यातून निघणाऱ्या frequencies (लहरी) विमानाच्या यंत्रणेमध्ये अडथळा निर्माण करतात, ज्यामुळे विमान कोसळून त्याला अपघात होतो.  पूर्वी अश्या काही विमान दुर्घटना घडल्यामुळे असा अंदाज बांधण्यात आला होता. परंतु हा अंदाज चुकीचा ठरला.

अधिकच्या निरीक्षणातून असे लक्षात आले की फोन/मोबाईल सिग्नल हे radio frequency मध्ये अडथळा आणू शकतात/आणतात. ही गोष्ट वारंवार घडत नाही पण जेव्हा घडते तेव्हा भयंकर परिणाम सोबत आणू शकते.

जेव्हा मोबाईल सिग्नल मुळे radio frequency मध्ये अडथळा येतो तेव्हा CD कशी अडकत अडकत चालते तसा आवाज येतो. या आवाजामुळे कानाला हेडफोन लावून बसलेल्या पायलटला अतिशय त्रास होतो.

Radio Frequency च्या माध्यामातूनच पायलट आणि एयर ट्राफिक कंट्रोल एकमेकांशी संवाद साधत असतात. तसेच अतिशय महत्वपूर्ण माहितीची देवाण घेवाण करत असतात. पण फोन सिग्नल मुळे निर्माण होणाऱ्या, डोकं दुखावणाऱ्या आवाजामुळे त्यांना एकमेकांशी संवाद साधणे कठीण होऊन बसते. अश्यावेळेस केवळ काही सेकंदासाठी जरी त्यांचे बोलणे तुटले तरी ते धोकायादक ठरू शकते.

अजूनही तुम्ही असे म्हणत असालं की त्या आवाजाने एवढं काय त्रास होतोय? तर एकदा तुम्ही देखील त्या आवाजाचा सामना करून बघाच. तुमच्या ऑडियो सिस्टमच्या जवळ तुमचा फोन ठेवा आणि कानाला हेडफोन लावून बसा. त्यावेळेस तुमच्या गाण्यात अडथळा आणणारा एक आवाज तुम्हाला सारखा ऐकू येईल, जो तुमचं डोकं उठवल्याशिवाय राहणार नाही. जोवर तुम्ही मोबाईल ऑडियो सिस्टम पासून लांब ठेवत नाही तोवर तो आवाज येणे सुरूच राहील.

तसेच विमानातून प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांनी जर त्यांच्या मोबाईल Airplane Mode सेट केला नाही तर मोठ्या प्रमाणात Radio Pollution देखील होते.

तर मग आता तुम्हाला या मागचं कारण कळलं आहेच, त्यामुळे पायलटला त्रास न होता त्याने विमान सुरक्षितपणे चालवावे असे वाटत असेल तर पुढच्या वेळेस तुमचा मोबाईल Airplane Mode वर सेट करायला विसरू नका.

Comments

Popular posts from this blog

शिवजयंती तिथीप्रमाणे का ?

लेख: आश्विन अमावास्येस लक्ष्मीपूजन हा सण साजरा केला जातो.

समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.