सर्दी आणि कफ झालाय? हे उपाय करुन पाहा

सर्दी आणि कफ झालाय? हे उपाय करुन पाहा

आरोग्य

ऋतूबदल होत असताना शरीर त्याला प्रतिसाद देत असते. दिवसभर कडक ऊन आणि रात्री आणि सकाळी थंडी या वातावरणात सर्दी आणि कफ हमखास होतो. घरातील एकाला हा त्रास झाला की हळूहळू तो सगळ्यांनाच होतो. मग सर्दीमुळे होणीरी डोकेदुखी, अंगदुखी, थकवा यासारखी लक्षणे दिसू लागतात. डॉक्टरांकडे जाऊन औषध घेणे हा त्यावरील उपाय आहेच. वारंवार कफ सिरप आणि औषधं घेणे योग्य नाही. काही वेळा घरगुती उपायांनीदेखील सर्दी बरी होऊ शकते. किंवा औषधांसोबत हे उपाय केल्यास लवकर आराम मिळू शकतो. घरच्या घरी कोणते उपाय करु शकतो पाहूया…

हळद – हळद हा स्वयंपाकघरातील एक उत्तम आयुर्वेदीक पदार्थ आहे. उत्तम असा अँटीसेप्टीक आणि अँटी बॅक्टेरीयल असणारा हा पदार्थ कफ आणि खोकल्याची समस्या दूर करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. यामुळे बऱ्याच शारीरिक समस्या दूर होण्यास मदत होते. मध, गूळ आणि हळद यांची गोळी करुन घेतल्यास ती सर्दीसाठी उपयुक्त असते. तसेच गरम दूध आणि हळद घेतल्यास कफामुळे घशाला होणाऱ्या त्रासापासून सुटका होते.

लिंबू – लिंबामध्ये असणारे सी-व्हिटॅमिन आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असते. लिंबामुळे प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. त्यामुळे वारंवार होणारी सर्दी आणि कफ यांची समस्या कमी होण्यास उपयोग होतो.

लसूण – लसूण आहारातील एक अतिशय महत्त्वाचा पदार्थ आहे. दिवसात प्रत्येकाने किमान ५ ते ६ लसूणाच्या पाकळ्या खाव्यात. लसणामध्ये असणारे गुण आरोग्यासाठी फायदेशीर असतात. त्यामुळे तुम्हाला सर्दी-खोकल्याचा त्रास वारंवार होत असेल तर तुम्ही आहारात लसूण आवर्जून ठेवा.

आले – आल्यामध्येही अनेक उपयुक्त गुणधर्म असतात जे कफ आणि सर्दीच्या त्रासापासून सुटका करण्यासाठी उपयुक्त ठरु शकतात. आले चवीला काही प्रमाणात तिखट असले तरीही आहारात त्याचा योग्य त्या प्रमाणात समावेश असायलाच हवा.

गुळण्या करणे – गुळण्या करणे हा घसा, सर्दी आणि कफासाठी एक उत्तम उपाय आहे. गरम पाण्यात मीठ आणि हळद टाकून गुळण्या केल्यास घशाचा संसर्ग लवकर बरा होतो. सर्दीचे विषाणू सर्वात आधी आपल्या घशावर आक्रमण करतात. त्यामुळे दिवसातून ३ ते ४ वेळा साध्या कोमट पाण्याने केलेल्या गुळण्याही कफासाठी उपयुक्त ठरतात.

Comments

Popular posts from this blog

समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.

मूलगीची तक्रार - कविता

शिवजयंती तिथीप्रमाणे का ?