सतत जांभया येतायत? हे उपाय करुन पाहा

सतत जांभया येतायत? हे उपाय करुन पाहा

झोप आली की अनेकांना एकामागून एक जांभया येतात. आळसामुळे जांभया येतात असा आपल्यातील अनेकांचा समज असतो. मात्र पुरेशी झोप न झाल्याने मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो आणि आपल्याला जांभया यायला लागतात. या जांभया इतक्या येतात की त्यांच्यावर नियंत्रण करणे अवघड होते. कधी एखाद्या तासाला बसलेलो असताना किंवा कधी ऑफीसच्या मिटिंगमध्ये जांभया येतात. अशी चारचौघात जांभयी आली की काय करावे ते आपल्यालाही कळत नाही. आता अशाप्रकारे वारंवार जांभया येऊ नयेत यासाठी काही खास गोष्टींची काळजी घेणे आवश्यक असते. पाहूयात काय आहेत या टिप्स…

१. सततच्या जांभयांनी हैराण झाले असाल तर डोक्यावर कोल्ड प्रेस ठेवा. यामुळे जांभया कमी होण्यास मदत होईल. शरीर थंड झाल्याने जांभयांचे प्रमाण कमी होते.

२. ऑक्सिजनच्या कमतरतेने जांभया येतात. त्यामुळे नाकाने दिर्घ श्वास घेऊन तोंडाने हळूहळू हा श्वास सोडल्यास जांभया कमी होण्यास मदत होते.

३. मित्र-मैत्रिणींशी गप्पा मारणे, विनोदी व्हिडिओ पाहणे यांमुळे जांभया आणि आळस कमी होण्यास मदत होते. असे केल्यास झोप येण्यालाही प्रतिबंध होतो असे एका संशोधनातून समोर आले आहे.

४. शरीर थंड असल्यास जास्त जांभया येत नाहीत आणि त्यामुळे थंड पेय प्या. यामध्ये आइस टी किंवा आइस कॉफी यांचा पर्याय उत्तम आहे.

५. ऑफीसमध्ये जेवण झाल्यानंतर झोप येऊ नये म्हणून जेवल्या-जेवल्या डेस्कवर बसण्यापेक्षा ऑफीसच्या खाली किंवा बाहेर एखादी चक्कर मारुन या.

६. तोंडात काहीतरी चघळत ठेवणे जांभया आणि झोप जाण्यासाठी फायद्याचे ठरते.

Comments

Popular posts from this blog

शिवजयंती तिथीप्रमाणे का ?

लेख: आश्विन अमावास्येस लक्ष्मीपूजन हा सण साजरा केला जातो.

समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.