परिक्षेच टेन्शन कधीच नाही येणारं, वाचा या टीप्स

👨🏻‍🏫 परिक्षेच टेन्शन कधीच नाही येणारं, वाचा या टीप्स

परीक्षेचे दिवस पुन्हा सुरू झालेयत. विद्यार्थ्यांनी आपल वेळापत्रकही बनवायला सुरूवात केलीए. अशावेळी विद्यार्थ्यांआधी पालकांचीही परीक्षा असते.

पालक ओरडतील या भितीने अभ्यासाला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त असते. बरीच मुल अभ्यास तर करतात पण ऐनवेळी आजारी पडतात.

परीक्षेचा ताण घेतात. अशावेळी काय करायच ? चला जाणून घेऊया...

हेल्दी राहा
परीक्षेआधी जंक फूड खाण आरोग्यासाठी अपायकारक आहे. उघड्यावरील खाणे टाळून बंद डब्यातील खाण्यास पसंती द्या.

ज्यामध्ये फॅट्स , जास्त गोड किंवा ज्यामुळे तुम्हाला आळस येईल, अभ्यासावर परिणाम होईल असे काही खाऊ नका. 
 
खूप तणावात असाल आणि भुक लागली तर बदाम, ताजी फळं, भाज्या खाऊ शकता. जेवणात अंड, डाळींचा उपयोग करु शकता. 

झोप पूर्ण घ्या
वर्षभर अभ्यास केला नसेल तर एका रात्रीत जागून अभ्यास होत नाही. त्यामूळे झोप पूर्ण करा आणि अभ्यासाला बसा.

परीक्षेच्या आदल्या रात्रीही झोप पूर्ण घ्या. नाहीतर जे वाचलय तेही नीटस लक्षात राहणार नाही. पूर्ण झोप घेतल्याने तणावही कमी होतो.

डोक शांत ठेवा 
डोक शांत ठेवून अभ्यास केलात तर परीक्षेत खूप फायदा होईल. 'प्लान ए' जर फेल होत असेल तर 'प्लान बी' तयार ठेवा.

सुरू असलेली परीक्षा ही आयुष्यातील शेवटची परीक्षा नाही. त्यामूळे तब्येतीची काळजी घ्यायला हवी. अजून खूप परीक्षा आपल्याला द्यायच्या आहेत.

Comments

Popular posts from this blog

समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.

मूलगीची तक्रार - कविता

शिवजयंती तिथीप्रमाणे का ?