विदेशी पर्यटक भारताकडे इतके का आकर्षित होतात?

विदेशी पर्यटक भारताकडे इतके का आकर्षित होतात? ‘ही’ कारणे देतील तुम्हाला उत्तर !

आपला भारत देश हा विविधतेने नटलेला आहे. विविध धर्म, पंथ, जातीचे लोक आपल्याला येथे पाहायला मिळतात. विविध परंपरा आणि सण असलेला आपला भारत सर्वांनाच आपल्याकडे आकर्षित करतो. संस्कृती जपण्यामध्ये भारत कुठेही मागे पडलेला नाही. विदेशातील दरवर्षी कितीतरी लोक भारतामध्ये पर्यटनासाठी येतात. आपण आपल्याच देशाला कधी – कधी नावे ठेवतो, पण परदेशातील लोक नेहमी भारताची स्तुतीच करताना आपल्याला दिसतात. पाहुण्यांना देव मानायची रीत, पहिल्यापासूनच आपला देशात चालत आलेली आहे. त्यामुळे येथे पर्यटनाला येणारी परदेशी माणसे ही बहुतेकदा चांगलाच अनुभव घेऊन त्यांच्या देशात परततात. भारतामध्ये मिळणारे पदार्थांमधील वेगळेपण, कदाचितच तुम्हाला दुसऱ्या कोणत्या देशात पाहण्यास मिळेल. सर्व धर्मातील माणसे येथे पाहण्यास मिळतात, त्यामुळे हे सर्व पाहण्यासाठी आणि भारताला जवळून अनुभवण्यासाठी बहुतेक विदेशी लोक भारतामध्ये येतात. चला तर मग जाणून घेऊया अश्या कोणत्या गोष्टी आहेत, ज्या विदेशी लोकांना देखील भारतात पर्यटनासाठी येण्यासाठी आकर्षित करतात..

१. पदार्थांमधील विविधता
भारतीय खाद्यपदार्थांमध्ये असलेली विविधता परदेशी पर्यटकांना खासकरून आवडते. शाकाहारी आणि मांसाहारी अश्या दोन्ही प्रकारचे पदार्थ भारतामध्ये उत्तम मिळतात. चटणी, करी आणि भाज्यांचे मोहक वर्गीकरण पर्यटकांना आकर्षित करते. वडापाव आणि चटणी यांसारखे रस्त्यावरील पदार्थ देखील त्यांना आवडतात आणि हे पदार्थ ते मोठ्या आवडीने खातात.

२. भारताचा इतिहास
भारताला खूप मोठा इतिहास लाभला आहे. भारताचा इतिहास हा चित्र, शिल्प आणि शिलालेखांच्या माध्यमातून सांगण्यात आलेला आहे. राजे – राजवाडे, क्रांतिकारी चळवळी यांचा इतिहास जाणून घेण्यासाठी परदेशी पर्यटक भारतात येतात.

३. पर्यटन स्थळे
विविधतेच्या दृष्टीने भारताचा भूगोल हा अभिमानास्पद आहे. केरळचे बॅकवॉटर असो किंवा लेह – लडाखचा उंचीवरील रोमांचकारी प्रवास असो. अश्या वेगवेगळ्या पर्यटन स्थळांसाठी भारत प्रसिद्ध आहे. विदेशी पर्यटकांना ही पर्यटन स्थळे खूप भावतात.

४. विधी, परंपरा आणि संस्कृती
विवाहाच्या परंपरा आणि उत्साहवर्धक धार्मिक विधी अनेक वेळा विदेशी पर्यटकांवर छाप सोडून जातात. भारतामध्ये साजरे करणारे सण पाहण्यासाठी हे पर्यटक मोठ्या उत्साहाने येतात. काही विदेशी सेलिब्रेटी देखील भारतीय संस्कृतीनुसार विवाह करण्यासाठी उत्सुक आहेत. येथील विवाहाची भव्यता आणि अतिथी पाहून त्यांना येथील विवाह सोहळा खूप आवडतो.

Comments

Popular posts from this blog

समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.

मूलगीची तक्रार - कविता

शिवजयंती तिथीप्रमाणे का ?