अशाप्रकारे '७' दिवसात करा वजन कमी!
Health Tips : अशाप्रकारे '७' दिवसात करा वजन कमी!
आपली बदलेली जीवनशैलीचे आरोग्यावर दुष्परिणाम होतात, असे म्हणायला काही हरकत नाही. अपुरी झोप, अवेळी खाणे, ताण-तणाव त्याचबरोबर बैठे काम यामुळे आरोग्यावर विपरित परिणाम होतात. अनेकदा आपल्याला व्यायामासाठी वेळ मिळत नाही. पण तुम्हाला माहित आहे का, उभं राहण्याने देखील वजन कमी होते. नवीन संशोधनातून हे सिद्ध झाले आहे. दोन्ही पायांवर समान वजन टाकून व्यवस्थित उभे राहिल्याने अतिरिक्त वजन कमी होते. संशोधकांनी सांगितले की, बसण्याच्या तुलनेत उभे राहिल्याने मिनीटाला ०.१५ कॅलरीज अधिक बर्न होतात.
दिवसभरात सुमारे ६ तास बसण्यापेक्षा उभे राहिल्याने सुमारे ५४ अतिरिक्त कॅलरीज बर्न होतात. अमेरिकेतील मायो क्लिनिक इन रोचेस्टरच्या प्रोफेसर फ्रांसिस्को लोपेज जिमेनेज यांनी सांगितले की, उभे राहिल्याने फक्त कॅलरीज बर्न होत नाहीत तर हार्ट अॅटक, स्ट्रोक, मधूमेह होण्याची शक्यताही कमी होते. त्यामुळे उभे राहण्याचे फायदे अधिक आहेत.
स्थूलता, वाढलेले वजन हे अनेक आजारांचे मूळ आहे. त्यामुळे वजन नियंत्रित असणे गरजेचे आहे. वजन कमी करण्याचे काही सोपे उपाय. ज्यामुळे सात दिवसात वजन कमी करुन तुम्ही सुडौल शरीर मिळवू शकता. ७ दिवसात वजन कमी करण्याचे सोपे उपाय....
Comments
Post a Comment