आधुनिक संगणकाचा जनक : अॅलन ट्युरिंग

आधुनिक संगणकाचा जनक : अॅलन ट्युरिंग

          आज आपण संगणक शास्त्राचा वापर करून जी काही तंत्रज्ञानामध्ये प्रगती करत आहोत, त्याचे सर्व श्रेय अॅलन ट्युरिंगकडे जाते. आधीच्या काळी, संगणक हा फक्त त्यामध्ये फिड करण्यात आलेल्या गोष्टी करण्यापुरताच मर्यादित होता. त्यासाठीदेखील खूप कष्ट घ्यावे लागत. ‘त्या’ काळात अतिशय अशक्यप्राय समजली जाणारी गोष्ट म्हणजे मशीनला विचार करायला लावून, तिच्याकडून एखादे काम करवून घेणे. आणि यात अॅलन यशस्वी झाला होता. अॅलन ट्युरिंगच्या कामाचा, प्रोग्रामिंग भाषा तयार करण्यामध्ये मोठा प्रभाव आहे. एवढेच नव्हे तर आज ‘मानवनिर्मित बुद्धिमत्ता’ (Artificial Intelligence) ही जी संगणकीय शास्त्राची एक शाखा आहे, तिचादेखील अॅलन ट्युरिंगच जनक आहे. गूगलची ‘सेल्फ-ड्रायव्हिंग कार’, मायक्रोसॉफ्टचे ‘कोर्टाना’ (Cortana) आणि अॅपलची‘सिरी’ (Siri) हे वैयक्तिक सहाय्यक (PA) अॅप्, Cleverbot, … हे सर्व याच शाखेचे उपयोजनं आहेत. पण दुर्दैवाची बाब म्हणजे, एवढे महत्वाचे संशोधन करूनदेखील त्याला जिवंतपणी कधीच आदराची वागणूक देण्यात आली नाही. त्याच्या वाट्याला नेहमी दुखःच आले. तो समलैंगिक असल्यामुळे त्याचा खूप छळ करण्यात आला. आणि शेवटी परिस्थितीला कंटाळून त्याने आत्महत्या केली.

          अॅलन ट्युरिंगचा जन्म २३ जून,१९१२ साली, लंडन येथे एका उच्च-मध्यम कुटुंबामध्ये झाला. त्याचे वडिल ‘जुलिअस’ हे भारतीय नागरी सेवेत कामाला होते. ते अस्खलितपणे तमिळ आणि तेलुगु भाषा बोलत असत. भारतामध्येच त्यांची भेट ‘इथेल सारा स्तोनेय’ नावाच्या मुलीसोबत झाली. ती मद्रास (सध्याचे चेन्नई) येथील रेल्वे विभागाच्या मुख्य अभियांत्रिकाची मुलगी होती. दोघांचे सुत जुळले होते आणि त्यांचा राहणीमानाचा ‘दर्जा’(?) देखील बरोबरीचा होता. तेव्हा दोघांनी लग्न केले. त्यांना दोन मुले झाली. अॅलन ट्युरिंग हा धाकटा मुलगा होता. अॅलनच्या कुटुंबाचा शैक्षणिक आणि वैज्ञानिक जगाशी फारसा संबंध नव्हता. त्याचा मोठा भाऊ हा लंडनचा कायदेपंडित होता. पण अॅलन ट्युरिंग मात्र त्याच्या कुटुंबीयांपेक्षा खूपच वेगळा बनणार होता. वयाच्या सहाव्या वर्षी, अॅलन ट्युरिंग त्याच्या पालकांसोबत भारतात येणार होता पण तब्येतीच्या कारणास्तव तो आला नाही. त्यानंतर तो ‘शेर्बोर्ने पब्लिक स्कूल’मध्ये गेला.

          अॅलन ट्युरिंगला लहानपासुनच गणित व विज्ञानाकडे नैसर्गिक ओढ होती आणि ‘शेर्बोर्ने पब्लिक स्कूल’मध्ये शिक्षकांचा भर हा साहित्यावर होता. अॅलन ट्युरिंगची गणित आणि विज्ञानाविषयी असलेली आवड हि अभ्यासाच्या बाहेरील होती. तेव्हा तेथील शिक्षकांनी अॅलनच्या आईला बोलावून, ‘त्याला जर वैज्ञानिक क्षेत्रात कारकीर्द करायची असेल तर तो येथे त्याचा वेळ वाया घालवत आहे.’ असे स्पष्टपणे सांगितले होते. लहानपणीच ‘कॅल्क्युलस’ (गणिताचा एक प्रकार) न शिकताच तो गणितातील अतिशय कठीण प्रश्न सोडवत असे. वयाच्या १६व्या वर्षी, त्याची आईन्स्टाईनच्या कामाशी ओळख झाली. तेव्हा आईनस्टाईनच्या सर्व कामाचा स्वतःच अभ्यास करून, त्याने त्याच्या नोट्सदेखील बनवल्या होत्या.

          ट्युरिंगच्या नोट्सचे पदवी पातळीवर कौतुक केले जाते. अॅलन ट्युरिंग हा इतर मुलांपेक्षा खूपच वेगळा होता. तो नेहमी एकटाच राहत असे. आणि त्याचे वर्गमित्र त्याची नेहमीच चेष्टा करत असे. ट्युरिंगच्या मनावर या सर्व गोष्टींचा परिणाम झाला होता, म्हणूनच त्याने आयुष्यभर पुढे शांततेचा पुरस्कार केला. त्याचा तिथे एकच मित्र होता. त्याचे नाव होते ‘ख्रिस्तोफर मोर्कॉम’. एकदा असेच वर्गमित्र ट्युरिंगची थट्टा करत असताना, ख्रिस्तोफरने त्याची सुटका केली होती. अशाप्रकारे त्यांची ओळख झाली. त्या दोघांनाही गणितामध्ये विशेष रस होता. ट्युरिंगला जी ‘कोड ब्रेकिंग’मध्ये आवड होती, तीदेखील ख्रिस्तोफरमुळेच. ट्युरिंग मात्र ख्रिस्तोफरकडे आकर्षित झाला होता. ख्रिस्तोफर हा ट्युरिंगचा पहिला प्रेमी होता. ते दोघे विविध विषयांवर चर्चा करत असत. पण जेव्हा ख्रिस्तोफर क्षयरोग झाल्याने मेला, तेव्हा त्याच्या मनावर खूप खोलवर परिणाम झाला. आणि ‘आता ख्रिस्तोफरची स्वप्ने मलाच पूर्ण करायची करायची आहेत’ या उद्देशाने त्याने खूप अभ्यास करायला सुरुवात केली होती.

          पुढे १९३१ साली, गणितशास्त्रामध्ये पदवी घेण्यासाठी तो केंब्रीज येथील किंग्स कॉलेजमध्ये गेला. आणि प्रथम श्रेणी घेऊन तो तेथून बाहेर पडला. तो त्यावेळी किंग्स शिष्यवृत्तीला पात्र ठरला होता, तसेच ‘Probability Theory’ मध्ये योगदान दिल्याबद्दल Smith’s Prize मिळाले होते. त्या काळी ‘Decision Problem’ क्षेत्रात शोध लावण्यासारखे खूप सारे बाकी होते. ‘Decision Problem’ मध्ये एक प्रश्न असतो आणि त्याचे उत्तर फक्त ‘हो’ किंवा ‘नाही’ मध्येच असू शकते. एका नंतर एक मिळालेल्या उत्तरापासून आपण संच (Set) तयार करत जातो
_________________________________________
✒📋माहिती संकलन:- स्वप्निल आव्हाड, माळवाडी (शिवाजीनगर), ता. सिन्नर.

Comments

Popular posts from this blog

समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.

मूलगीची तक्रार - कविता

शिवजयंती तिथीप्रमाणे का ?