सक्सेस होण्यासाठी विराटचे कानमंत्र...
🎯 सक्सेस होण्यासाठी विराटचे कानमंत्र...
यश मिळवण्यासाठी आणि पुढे जाण्यासाठी आक्रमकता असणे आवश्यक असते, असे विराट कोहली म्हणतो. त्याने यशस्वी होण्यासाठी अशेच काही कानमंत्र दिले आहेत. त्यावर एक नजर...
🏹 तुम्ही किती टॅलेंटेड आहात याने काहीच फरक पडत नाही, तुम्ही किती कठोर मेहनत घेता त्यावर यश अवलंबून आहे.
🏹 सभोवती राहणाऱ्या लोकांचा तुमच्या स्वभाव आणि क्षमतेवर खूप मोठा परिणाम होतो. त्यामुळे नेहमी चांगल्या आणि एनर्जेटिक लोकांसोबत राहा.
🏹 मी कधीच कोणावर टीका करत नाही. त्यापेक्षा स्वतःच्या चुका शोधण्यात व सुधारण्यात आपली ऊर्जा खर्च करतो.
🏹 परफॉर्मन्स चांगला असो कि वाईट, स्वतःला सर्वात चांगले करण्यासाठी नेहमीच चीअर करत रहा.
🏹 आपली स्ट्रेंथ आणि विकनेस समजून घ्या. आरशात स्वतःला पाहण्यास शिकाल तेव्हाच यशस्वी व्हाल.
🏹 यश हवे असेल तर कम्फर्ट झोनमधून बाहेर पडा. आव्हाने स्वीकारा आणि स्वतःला सिद्ध करून दाखवा.
संकलन: श्री. स्वप्निल भिवाजी आव्हाड
सिन्नर, नाशिक.
🏏
Comments
Post a Comment