वजन घटवण्यासाठी हे आहेत स्वस्तात मस्त पदार्थ
वजन घटवण्यासाठी हे आहेत स्वस्तात मस्त पदार्थ
स्वस्तात वजन कमी करायचे असेल तर अनेक उपाय आहेत. असे कोणते पदार्थ आहेत जे खाल्ल्यानी वजन कमी होतेच पण खिशाला कात्रीही लागत नाही. पाहूयात स्वस्तात मस्त बारीक होण्याच्या या खास टिप्स…
🍇🍇द्राक्षे
द्राक्षामध्ये व्हीटॅमिन सी, फायबर आणि पाण्याचे प्रमाण जास्त असते त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. व्हीटॅमिन सीचा मेटाबॉलिझमवर आणि वाढलेली चरबी जाळण्यासाठी चांगला उपयोग होतो. द्राक्षे खाल्ल्यानंतरही बराच काळ भूक लागत नाही.
🍎🍎सफरचंद
दररोज सफरचंद खाल्ल्यास तुम्ही आरोग्यदायी राहाल असे नाही तर वजन घटण्यासही मदत होईल. सफरचंदातील अँटिऑक्सिडंटसमुळे मेटाबॉलिझमला उत्तेजन मिळण्यास मदत होते.
🍃☘पालक
पालकामध्ये कॅलरीज आणि कार्बोहायड्रेटचे प्रमाण कमी असते तर फायबरचे प्रमाण जास्त असते. पालकात आरोग्याला आवश्यक असणारे इतरही घटक असतात. तसेच पालकाची भाजी सहज कुठेही उपलब्ध होते.
🍵🍵ग्रीन – टी
ग्रीन टी मुळे प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. पोटावरील तसेच कंबरेवरील चरबी ग्रीन टीमुळे कमी होते आणि वजनही घटण्यास मदत होते. पण ग्रीन टी केव्हा घ्यायची याचे काही नियम आहेत, ते माहीत करुन घेऊन पाळायला हवेत. तरच ग्रीन टीचा वजन कमी करण्यासाठी उपयोग होतो.
🍚🍚 दलिया
दलिया हा सकाळच्या न्याहरीसाठी अतिशय उत्तम पर्याय ठरु शकतो. दलियामध्ये फायबर असल्याने पोट दीर्घकाळ भरलेले राहण्यासाठी चांगले असते. याचा चांगला उपयोग करुन घ्यायचा असेल तर दलियामध्ये साखर न घालता त्याचा उपमा केल्यास जास्त चांगले.
-------------------------------------------------------------
Comments
Post a Comment