Resume बनवताना या खास टिप्स वापरा आणि मुलाखत घेणाऱ्याला impress करा!
Resume बनवताना या खास टिप्स वापरा आणि मुलाखत घेणाऱ्याला impress करा!
नोकरी शोधताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणून रिझ्युमकडे पाहणे गरजेचे आहे. कारण रिझ्युम हे केवळ मुलाखतकाराला तुमच्याबद्दल संक्षिप्त स्वरुपात माहितीच देत नाही तर तुमच्या व्यक्तिमत्त्वाची छोटीशी झलक देखील दाखवते. बऱ्याचदा तुम्ही ज्यांच्याकडे तुमचा रिझ्युम पाठवला आहे ती कंपनी किंवा मुलाखतकार तुमच्या रिझ्युमवरून तुमचे मूल्यमापन करतात. म्हणजेच रिझ्युमवरून ठरवले जाते की तुम्ही कसे व्यक्ती आहात आणि त्या ठराविक कंपनीसाठी आणि पदासाठी पात्र आहात किंवा नाही? त्यामुळेच सध्याच्या काळात रिझ्युमला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालं आहे. जर तुमचा रिझ्युम उत्तम तर तुम्ही उत्तम असं समीकरणचं म्हणा ना! रिझ्युम हा समोरच्यावर पहिल्याच भेटीत आपली छाप पाडण्याचा सर्वात सोप्पा मार्ग आहे, म्हणूनच नोकरी शोधणाऱ्या प्रत्येकाने आपल रिझ्युम आकर्षक असण्यावर भर दिला पाहिजे. यासाठीच आम्ही तुम्हाला आज आकर्षक रिझ्युम बनवण्याच्या काही टिप्स सांगणार आहोत.
मुलाखतकर्ते रिझ्युम वरुन खाली वाचतात असा अनेकांचा समज असतो. त्यामुळं वरील काही माहिती मोठ्या अक्षरांमध्ये दिली जाते. मुलाखतकर्ते रिझ्युम सध्या खालून वर किंवा मध्येही वाचू शकतात. त्यामुळे अनुभव, कामगिरी अशी माहिती लिहीताना बोल्ड अक्षरात लिहिणं गरजेचं आहे
Comments
Post a Comment