टाकाऊतून टिकाऊ : टिकाऊतून टिकाऊ

टाकाऊतून टिकाऊ : टिकाऊतून टिकाऊ

हल्ली एखादी वस्तू खराब किंवा जुनी झाली की, ती फेकून देण्याकडे आपला कल जास्त असतो. मात्र आपण वेस्ट मटेरिअलमधून काही तर बेस्ट करू शकतो. थोडक्यात ’टाकाऊतून टिकाऊ’ आणि टिकाऊतून आणखी टिकाऊ असं काही तरी करू शकतो. त्यासाठी काही पर्याय आम्ही तुम्हाला देतोय. तुम्हीही थोडी कल्पना लावून वेस्टमधून बेस्ट करायचं ट्राय करा…

1) शीतपेयांच्या बाटल्यांचा वर निमुळता होत जाणारा भाग कापायचा. या बाटल्यांची झाकणे काढून खाण्याच्या पदार्थांच्या पिशव्यांचे उघडे तोंड या बाटलीच्या वरच्या भागातून बाहेर काढायचे. पिशवीचा हा भाग दुमडून त्यावरून बाटलीचे झाकण लावायचे. अशा पद्धतीने ती पिशवी हवाबंद होते.

2) घरात लावण्यात आलेल्या रोपट्यांचा लुक बदला. मातीच्या कुंड्यांना बांबू फ्रेमने सजवा. एक किंवा दोन कुंड्यांची फ्रेम बदलल्यास संपूर्ण खोलीचे रूपच बदलते.

3) आपल्या खोलीला ग्रीन लूक देणे खूप सोपे आहे. त्यासाठी घरातील एखादी जुनी बरणी, कुंडी किंवा कंटेनरमध्ये पाणी भरून घ्या. त्यात विविध प्रकारची फुले सजवा. कंटेनरला करड्या रंगाच्या दोरीने बांधा. त्यासाठी फेव्हिकॉलचा वापर करू शकता. अशा प्रकारे हँडमेड फुलांची कुंडी तयार होईल.

4) घरातील जुन्या बाटल्या फेकू नका. त्यांचा वापर सजावटीसाठी करा. हे अतिशय सोपे आहे. छतावर किंवा गॅलरीत एक लोखंडी स्टॅण्ड ठेवा. त्यात घरातील बाटल्यांसारख्या ’मिसफिट’ वस्तू ठेवा. यात कृत्रिम फुले व सजावटीच्या इतर छोट्या-छोट्या वस्तू ठेवता येतील.

5) बाजारात पोर्सेलीनचे अनेक प्रकारचे स्टायलिश कॅण्डल स्टॅण्ड उपलब्ध आहेत. घराच्या सौंदर्यात हे स्टॅण्डस् भर घालतात.

6) रंगीबेरंगी आणि विविध प्रकारचे कुशन्स वापरून ड्रॉईंग रूमची नजाकत वाढवा. यात सोनेरी, केशरी व लाल रंगांचा ट्रेंड आहे.

7) तुटलेल्या छत्रीचा उपयोग तुम्ही वस्त्रे लटकवण्यासाठी करू शकता.

8) फाटलेल्या जीन्सच्या खिशाचा उपयोग करून तुम्ही त्यात विविध वस्तू सहज ठेवू शकता. याकरिता खराब जीन्सचा खिसा कापून वेगळा करायचा. त्यानंतर त्याला धरण्यासाठी किंवा लटकवण्यासाठी बंद शिवून घ्या. यात तुम्ही तुमचे पेन, मोबाईल, स्टेशनरी किंवा इतरही गोष्टी सहज ठेवू शकता. विशेष म्हणजे हे दिसायला अतिशय आकर्षक असे दिसते.

9) झाडे लावण्यासाठी तुटलेल्या बादल्यांपासून सिमेंटच्या पोत्यांपर्यंत अनेक गोष्टींचा वापर करू शकता.

10) हलके सामान ठेवण्यासाठी पर्यावरणपूरक कागदी बॅगा, वर्तमानपत्रांच्या सुरनळ्यांपासून बनवलेली बास्केटस्, कॉफी मग होल्डर, पेन स्टॅण्ड असे विविध प्रकार बनवता येऊ शकतात.

Comments

Popular posts from this blog

समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.

मूलगीची तक्रार - कविता

शिवजयंती तिथीप्रमाणे का ?