पेनाच्या टोपणाला छिद्र का असतं..?
पेनाच्या टोपणाला छिद्र का असतं..?
पेन ही तशी रोजच्या वापरातली गोष्ट! बहुतेक जणांच्या रोजच्या जीवनाचा पेन म्हणजे अविभाज्य भागच म्हणा ना! खिशाला पेन लावल्याशिवाय यांचा दिवसच सुरु होत नाही असं म्हटलं तरी अतिशयोक्ती होणार नाही. असा हा पेन दिसायला लहान असला तरी त्याचा मोठा फायदा आपल्याला होतो. कधी गरज पडली आणि हा पेन जवळ नसला एकी तुमचं काम रखडलं समजा. या पेनकडे फारच कमी लोकांनी बारकाईने पाहिलं असेल. ज्यांनी पाहिलं असेल त्यांना पेन कॅपच्या टोकाला लहानसं छिद्र नक्कीच आढळलं असेल. आणि त्याच वेळी मनात प्रश्न उद्भवला असेल असं का बरं?
जर आजवर तुमची या गोष्टीकडे कधी नजर गेली नसेल तर आता लगेच नजर टाकून बघा. तुम्हाला पेन कॅपच्या टोकाला छिद्र दिसेल. चला तर आज या मागचं कारण जाणून घेऊ!
बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की पेनच्या निबची शाई वाळावी यासाठी पेन कॅपच्या टोकाला छिद्र दिलेलं असतं. पण हा पूर्णत: गैरसमज आहे. पेन कॅपच्या टोकाला या कारणासाठी छिद्र दिलेलं नाही.
खरंतर पेन कॅपच्या टोकाला छिद्र असंण ही आजवरची सर्वात हुशार शक्कल म्हटली गेली पाहिजे. ज्यांनी बॉल पेनची निर्मिती केली त्या बिक क्रिस्टल कंपनीच्या डोक्यातून पेन कॅपच्या टोकाला छिद्र ठेवण्याची नामी युक्ती बाहेर आली.
अनेकांना – विशेषत: लहान मुलांना – पेन कॅप तोंडात घालण्याची सवय असते. जर कॅप चुकून तोंडात गेली आणि अडकली तर त्यामुळे श्वासोच्छवासात अडथळा निर्माण होऊन जीव देखील जाऊ शकतो आणि पेन कॅपच्या टोकाला छिद्र नसल्यास त्यातून हवा जाण्याचा मार्ग देखील बंद होऊ शकतो.
हाच विचार करून पेन कॅपच्या टोकाला मुद्दाम छिद्र ठेवलं आहे.
_______________________________________
✒📋 माहिती संकलन:- स्वप्निल भिवाजी आव्हाड, माळवाडी - सिन्नर.
Comments
Post a Comment