गाडीमध्ये असलेल्या सीटवरील हेडरेस्टचा नक्की उपयोग काय ? जाणून घ्या…..!

गाडीमध्ये असलेल्या सीटवरील हेडरेस्टचा नक्की उपयोग काय ? जाणून घ्या…..!

गाडीमधील सीट्स तर तुम्ही पहिल्याच असतील, त्या गाड्यांमध्ये सीट्सच्यावर डोके ठेवण्यासाठी एक जागा दिलेली असते. त्याला हेडरेस्ट असे म्हणतात. ही सीट तुम्ही काढून ठेवू शकता. तर याबद्दल असा दावा केला जातो की हेडरेस्ट अश्यातर्हेने डिजाईन केलेले असते जेणेकरून कधी तुम्ही गाडीमध्ये फसला असाल आणि गाडी पूर्णपणे लॉक झाली, तर अशावेळी तुम्ही याचा वापर करून गाडीची काच फोडून बाहेर पडू शकता आणि आपली सुटका करून घेऊ शकता, असे देखील म्हणतात. पण हा दावा खोटा आहे.

तर मग या हेडरेस्टचा वापर नक्की कशासाठी केला जातो, हा प्रश्न तुमच्या मनामध्ये आला असेलच. चला मग जाणून घेऊया याच्या वापराबद्दल…

हेडरेस्टचा उद्देश असतो- चालकाने गाडीचा अर्जंट ब्रेक दाबल्यास आपल्या डोक्याचे आणि मानेचे संरक्षण करणे!

चालकाने अर्जंट ब्रेक दाबल्यानंतर मुख्यत: प्रवाश्यांच्या मानेला हिसका लागतो आणि डोके पाठीमागे जोरात आदळते. त्यामुळे मानेला आणि डोक्याला काही इजा होऊ नये, यासाठी हेडरेस्ट दिले गेलेले असते. आपल्या मानेपेक्षा आपल्या डोक्याचे वजन जास्त असते. त्यामुळे डोक्याला आणि मानेला संतुलित ठेवून अचानक काही घटना झाल्यास त्याच्या परिणामाने आपल्याला इजा होऊ नये, म्हणून हेडरेस्ट दिलेले असते. हेडरेस्टच्या डिझाईनचे पहिले पेटंट १९२१ मध्ये अमेरीकेमधील एका शोधकर्त्याला मिळाले होते, पण १९६९ पर्यंत यांचा वापर केला गेला नव्हता.

पण त्याचे महत्त्व कळून आल्यावर मात्र १९६९ नंतर गाडीमध्ये हेडरेस्ट बंधनकारक करण्यात आले.

कॅलिफोर्नियच्या ऑकलँडमध्ये राहणाऱ्या बेंजामीन कॅट्झ यांनी हेडरेस्टचा शोध लावला होता, त्यांनी आपल्या पेटंटचे रजिस्ट्रेशन देखील केले होते. त्यांनी आपल्या पेटंटची माहिती देताना असे सांगितले की, गाडी खूप चालवल्याने चालकाला आलेला थकवा दूर करण्यासाठी याचा वापर होऊ शकतो, तसेच अर्जंट ब्रेक दाबल्यानंतर चालकाच्या किंवा प्रवाश्यांच्या डोक्याला आणि मानेला काही इजा होऊ नये म्हणून याचा वापर करता येऊ शकतो. गाडीमध्ये अडकल्यावर गाडीची काच तोडून बाहेर पडण्यासाठी याचा वापर करतात, असे त्यांनी कुठेही सांगितले नाही आहे.

१९३० मध्ये विस्कोन्सिन स्थित स्वेवर क्विझिंग यांनी या हेडरेस्टमध्ये काही बदल केले, त्यांना त्यासाठी एक वेगळे पेटंट देण्यात आले. त्यांनी यामध्ये सागितले होते की, ह्या नव्या हेडरेस्टचा वापर जॅकेट आणि इतर कपडे टांगण्यासाठी होऊ शकतो आणि मानेला आराम देण्यासाठी देखील होऊ शकतो.

१९५० मध्ये डेट्रोइट येथे राहणाऱ्या लॉरन्स स्कॉट याला अजून एक पेटंट दिले गेले. त्यांनी या हेडरेस्टमध्ये आणखी काही बदल केले. त्यांनी सांगितले की, मी नव्याने बनवलेला हेडरेस्ट हा आपण काढून ठेवू शकतो आणि आपल्याला जेव्हा गरज असेल तेव्हा लावू शकतो. पण त्यांनी त्याचा उपयोग काच फोडून संकटकाळी बाहेर पडण्यासाठी होतो, असे कुठेही सांगितले नाही आहे.

तर असा आहे गाड्यांचा सीटवर असणाऱ्या हेडरेस्टचा उपयोग. जर तुम्ही त्याच्या उपयोग संकटकाळी बाहेर पडण्यासाठी होतो, असे समजत असाल, तर तो तुमचा गैरसमज आहे आणि आता तो गैरसमज नक्कीच दूर झालेला असेल. असे हे हेडरेस्ट तुमच्या डोक्याला आणि मानेला आराम देण्यासाठी असतात.

संकलन: श्री. स्वप्निल भिवाजी आव्हाड
सिन्नर, नाशिक.

Comments

Popular posts from this blog

शिवजयंती तिथीप्रमाणे का ?

लेख: आश्विन अमावास्येस लक्ष्मीपूजन हा सण साजरा केला जातो.

समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.