नोकरीसाठी इंटरव्ह्यूला जाताना ‘या’ चुका टाळा

नोकरीसाठी इंटरव्ह्यूला जाताना ‘या’ चुका टाळा

                करीयरचा विशिष्ट टप्पा पार केला की तरुणांना वेध लागतात ते नोकरीचे. आता नोकरी मिळवायची म्हणजे त्याठिकाणी परीक्षा देणे आलेच. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असलात तरीही नोकरीसाठी तुम्हाला एखादी लेखी परीक्षा आणि इंटरव्ह्यू द्यावाच लागतो. तुमच्या या इंटरव्ह्यूमधून वरिष्ठ तुमची निवड करायची का नाही ते ठरवत असतात. आता इंटरव्ह्यूला नेमके कोणते प्रश्न वाचरले जातील, आपण त्याची कशी उत्तरे द्यायची, आपल्याला उत्तरे देता आली नाहीत तर काय? असे एक ना अनेक प्रश्न विशिष्ट टप्प्यांवर प्रत्येक तरुणाला पडतातच. यामध्ये तुम्हाला काही गोष्टींची किमान माहिती असायला हवी. पाहूयात इंटरव्ह्यूला जाताना कोणती काळजी घ्यायला हवी…

१. कंपनीबाबत माहिती नसणे
आपण ज्या कंपनीमध्ये इंटरव्ह्यू द्यायला जात आहोत त्या कंपनीची आपल्याला किमान माहिती असणे आवश्यक आहे. याचे कारण म्हणजे कंपनी कोणत्या क्षेत्रात काम करते आणि त्यांची आवश्यकता काय आहे याबाबत आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात. यामध्ये त्या विशिष्ट कंपनीबरोबर तुम्हाला काम करायला का आवडेल? असाही प्रश्न विचारला जातो. त्यामुळे ही माहिती असेल तर आपल्याला इंटरव्ह्यू घेणाऱ्याकडून विचारले जाणारे प्रश्न अवघड जात नाहीत.

२. पगाराला जास्त महत्त्व देणे
नोकरी ही पैसे कमावण्यासाठी असते हे खरे आहे. मात्र तुमचा नोकरी करण्याचा उद्देश हा केवळ पगार हाच आहे असे इंटरव्ह्यू घेणाऱ्याला वाटणार नाही याची काळजी घ्यावी. इंटरव्ह्यूमध्ये सतत पगाराविषयी बोलणे किंवा पगारावर अडून राहणे योग्य नाही. त्यामुळे तुमची चुकीची इमेज तयार होऊ शकते. म्हणून इंटरव्ह्यूमध्ये सतत पगाराविषयी बोलू नका.

३. अति आत्मविश्वास असणे
अनेक जण आपला समोरच्यावर प्रभाव पडावा यासाठी विशेष कष्ट घेतात. यामध्ये जास्त आत्मविश्वास दाखवतात. मात्र असे करण्याने तुमचा चांगला प्रभाव पडण्याऐवजी चुकीची इमेज तयार होऊ शकते. ही चूक इंटरव्ह्यूला गेल्यावर अनेक जण करतात. मात्र ती त्यांच्या अंगाशी येऊ शकते. त्यामुळे इंटरव्ह्यूला गेल्यावर कोणताही शो ऑफ न करता तुम्ही जसे आहात तसेच स्वत:ला प्रेझेंट करा.

४. चांगले कपडे घाला
अनेकांना इंटरव्ह्यूला जाताना कशा प्रकारचे कपडे घालायचे याची माहिती नसते. असे लोक इंटरव्ह्यूला जातानाही अतिशय कॅज्यूअल कपडे वापरतात. तसेच जास्त भडक कपडे घालून इंटरव्ह्यूला जाणे हेही चांगले नसते. त्यामुळे तुम्ही फिक्या रंगाचे आणि फॉर्मल कपडे घालून इंटरव्ह्यूला जाणे महत्त्वाचे आहे. हे कपडे स्वच्छ धुतलेले आणि इस्त्री केलेले असावेत. मुख्य म्हणजे या कपड्यांमध्ये तुम्हाला आरामदायी वाटायला हवे.

५. उशीरा जाणे
भारतीय लोक वेळेच्या बाबतीत अतिशय निवांत असतात, कोणत्याही ठिकाणी उशीरा जाण्यामध्ये त्यांचा कोणीच हात धरु शकत नाही असे आपण नेहमी ऐकतो. पण कोणत्याही ठिकाणी ठरलेल्या वेळेहून उशीरा पोहोचणे ही अजिबात चांगली सवय नाही. त्यातही इंटरव्ह्यूला जाताना उशीरा जाणे हे अतिशय चुकीचे आहे. त्यामुळे तुमची इमेज सुरुवातीलाच खराब होऊ शकते.

Comments

Popular posts from this blog

शिवजयंती तिथीप्रमाणे का ?

लेख: आश्विन अमावास्येस लक्ष्मीपूजन हा सण साजरा केला जातो.

समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.