¶¶..बाप..¶¶
¶¶..बाप..¶¶
अक्षता टाकत होता
घाम पुसायच्या निमित्ताने
डोळे पुसत होता //1//
काळजाच्या तुकड्याला पाहुन
आतुन तुटत होता
" पोरीचं चांगलं झालं "
हसुन म्हणत होता //2//
अश्रुंचा बांध त्यानं
अडवुन धरला होता
डोळयासमोरुन लेकिचा चेहरा
दुर होत नव्हता //3//
लग्न लागल्यावर सारेच
टाळ्या वाजवत होते
एक तोच मात्र
आसवांमध्ये भिजत होता //4//
लहानमोठ्यांना तो
हात जोडत होत
" लेकिला जीव लावा माझ्या "
डोळे भरून सांगत होता //5//
सायंकाळी सारे पाहुणे
खिचडीभात खात होते
बापाचा हात न वाजणार्या
फोनकडे जात होता //6//
लेकिचा फोन येताच
" मिरची तिखट आहे " म्हणत
तांब्यानं पाणी पित होता
अन डोळयातलं आसव मागं सारत होता. //7//
सुगी संपल्यावर पाखरांसारखा
एकेक पाहुणा परतत होता
शेवटच्या पाहुण्याला पोहचवुन
" मला भुक नाही "असं
बाप म्हणत होता //8//
बेडरूममधील लेकीचं कपाट
हळुच बाप उघडत होता
तिने ठेवलेल्या कपड्यांवरून
थरथरता हात फिरवत होता //9//
तिथच बेडवर बसुन
ओंजळीत तोंड धरून बाप
आवाज न करणार्या
धबधब्यासारखा फुटत होता//10//
मांजरीच्या पावलांनी पाठोपाठ आलेली मनकवडी बायको
" आई " होत होती
वय वाढलेल्या सशाला
छातीशी घट्ट धरून
काळजाच्या तुकड्याला आठवुन
आसवांमध्ये भिजत होती.. //11//
हे अस नात वडील आणि मुलगी..
म्हणून म्हणतो एक तरी लेक असावी.
डोळ्यातील प्रत्येक थेंबात दिसणारी..
✍🏻✍🏻✍🏻 🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋
💐💐💐💐💐💐💐
Comments
Post a Comment