अनलिमिटडेड इंटरनेटसह मेसेजही फ्री देणारे सिम लॉन्च, १६५ देशांमध्ये मिळणार सुविधा

📩 अनलिमिटडेड इंटरनेटसह मेसेजही फ्री देणारे सिम लॉन्च, १६५ देशांमध्ये मिळणार सुविधा

मोबाईल सिमकार्ड देणारी कंपनी चॅट सिमने एक धमाकेदार सिमकार्ड लॉन्च केले आहे. हे कार्ड तुम्हला अनलिमिटडेड इंटरनेट आणि मेसेजही फ्री देणार आहे.

मोबाईल सिमकार्ड देणारी कंपनी चॅट सिमने एक धमाकेदार सिमकार्ड लॉन्च केले आहे. हे कार्ड तुम्हला अनलिमिटडेड इंटरनेट आणि मेसेजही फ्री देणार आहे. ही सुविधा चक्क १६५ देशांमध्ये उपलब्ध असणार आहे.

 'मोबाईल वर्ल्ड काँग्रेस २०१८'मध्ये होणार सादर
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या सिमकार्डच्या माध्यमातून ग्राहकास अनलिमिटेड इंटरनेट सर्फिंग आणि मेसेजिंग करता येणार आहे. विशेष असे की, या सिमसाठी वेगळे असे काणत्याही प्रकारचे शुल्क द्यावे लागणर नाही. चॅट सिमच्या वार्षीत प्लानअंतर्गत ही सुविधा तब्बल १६५ देशांमध्ये उपलब्ध असणार आहे. हे सिम बार्सिलोनामद्ये २६ फेब्रुवारी ते एक मार्च अशा कालावधीत चालणाऱ्या 'मोबाईल वर्ल्ड काँग्रेस २०१८'मध्ये सादर केले जाईल.

'मोबाईल वर्ल्ड काँग्रेस २०१८'मध्ये होणार सादर
दरम्यान, यापूर्वीही कंपनीने एक चॅट सिम लॉन्च केले होते. तेव्हा या सिमच्या माध्यमातूनही ग्राहकांना फोटो, व्हिडिओ पाहता आणि पाठवता तसेच, व्हाईस कॉलिंगकही करता येत होते. पण, त्यासाठी ग्राहकांना काही मल्टीमीडिया क्रेडिट्स खेरेदी करावी लागत असत. आता नव्या सिमबाबत कंपनीचा दावा आहे की, ग्राहकांना इंटरनेट सर्फिंग आणि बाकी मोबाईल अप्लिकेशन्सचा वापर करण्यासाठी इतर कोणत्याही प्रकारचे क्रेडिट घ्यावे लागणार नाही.

सिमसोबत विविध अॅपही उपलब्ध
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, चॅट सिम २ हे जगभरातील सुमारे १५० टेलिकॉम ऑपरेटर्स सोबत काम करेन. ज्यांची सेवा १६५ हूनही अधिक देशांमध्ये आहे. या सिमसोबत व्हाट्सअॅप, फेसबुक, मेसेंजर, व्ही चॅट, टेलीग्राम, इंन्स्टाग्राम यांसारखी अॅपही उपलब्ध असतील.

Comments

Popular posts from this blog

समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.

मूलगीची तक्रार - कविता

शिवजयंती तिथीप्रमाणे का ?