काय तुम्हालाही ही सवय आहे ...?

काय तुम्हालाही ही सवय आहे ...?

फावल्या वेळेस बसल्या बसल्या अनेकांना डोळे चोळण्याची, कानात, नाकात बोटं घालण्याची सवय असते. अशा सवयींमुळे नकळत इन्फेक्शन वाढण्याचा धोका असतो. परिणामी काही आजार आणि आरोग्याच्या समस्या आपण स्वतःहून ओढावून घेतो हे तुम्हांला ठाऊक आहे का ?  

👉 डोळे चोळण्याची सवय
तुम्हांला डोळे चोळण्याची सवय असल्यास त्यामुळे इंफेक्शनचा उधोका बळावण्याची शक्यता असते हे तुम्हांला ठाऊक आहे का? डोळे चोळल्याने नखांवरील, हाताच्या बोटांवरील अदृश्य असणारे कीटाणू डोळ्यात जातात परिणामी डोळे दुखणे, चुरचुरणे,लाल होणे किंवा एखादे गंभीर इंफेक्शन वाढण्याचा धोका असतो. 

👉 सतत चेहर्‍याला हात लावणं
अनेकदा चेहर्‍याला हात लावण्याची सवय त्वचेला हानीकारक ठरू शकते. हातांच्या बोटांवरील बॅक्टेरीया आणि चेहर्‍यावरील तेल यांचा संपर्क आल्यास पिंपल्स, ब्लॅकहेड्स यांचा त्रास वाढतो.  

👉 कानात बोटं घालण्याची सवय
कानातील मळ साफ करण्यासाठी, खाज आल्यास अनेकजण कानात बोटं घालतात किंवा इतर काही वस्तूंचा वापर करतात. यामुळे कानाच्या पडद्याचे नुकसान होते. कानात इंफेक्शन होऊ शकते. 

👉 नाकात बोटं घालणं
नाक साफ करण्यासाठी किंवा अगदी फावल्या वेळेतही काहीजण सहज नाकात बोटं घालतात. यामुळे इंफेक्शन वाढण्याची शक्यता असते. 

👉 नखावरील त्वचा
नख किंवा त्याच्या आजूबाजुची त्वचा थेट नेलकटरने कापता येत नाही तेव्हा अनेकजण ती दातांनी खेचून काढतात. पण अशावेळेस नखातील न दिसणारी घाण नकळत तोंडात जाते. परिणामी अनेक इंफेक्शन वाढतात.  

👉 हात न धुता तोंडात घालणं
अनेकदा जेवणं किंवा इतर काहीही खाण्यापूर्वी हात धुण्याची सवय नसल्यास त्यामुळे अनेक बॅक्टेरिया अन्नपदार्थासोबत शरीरात जातात. परिणामी काही इंफेक्शन, पचनाचे आजार वाढण्याचा धोका बळावतो

Comments

Popular posts from this blog

समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.

मूलगीची तक्रार - कविता

शिवजयंती तिथीप्रमाणे का ?