Health Tips : हिरवे चणे खाण्याचे '५' आरोग्यदायी फायदे!

Health Tips : हिरवे चणे खाण्याचे '५' आरोग्यदायी फायदे!

हिरवे चणे खाण्यास जितके चविष्ट असतात तितकेच त्याचे आरोग्यदायी फायदे देखील आहेत. पराठे, भाजी, सलाड किंवा उकडलेल्या हिरव्या चण्यांची भेळ किती मस्त लागते नाही का? मग त्यातून मिळणारे फायदेही जाणून घेऊया...

ऊर्जा मिळते
हिरवे चणे खाल्याने शरीराला ऊर्जा मिळते आणि थकवा दूर होतो. हिरव्या चणांची भाजी, सलाड तुम्ही खाऊ शकता. त्याचबरोबर उकडलेले हिरवे चणे देखील स्वादिष्ट लागतात.

हाडांना बळकटी येते
हिरव्या चण्यात व्हिटॉमिन सी आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे हाडे बळकट होतात आणि शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते. 

ब्लड शुगर नियंत्रित राहते
हिरव्या चण्यांमध्ये रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्याचे गुणधर्म असतात. चण्यात फायबर भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे शरीरात ब्लड फॅटचे नियमन व्यवस्थित राहते. त्याचबरोबर त्यात साखरेचे प्रमाण नसल्याने मधुमेहींसाठीही फायदेशीर ठरतात. 

डोळ्यांच्या आरोग्यासाठी
चण्यात खूप सारे विटॉमिन्स आणि मिनिरल्स असतात. डोळ्यांच्या आरोग्यासाठी ते लाभदायी ठरतात. व्हिटॉमिन ए, ई, सी, के आणि बी कॉम्पेलेक्स असल्याने दृष्टी सुधारते. 

हृदयविकार राहतील दूर
हिरव्या चण्यांचे सेवन केल्याचे हृदयविकारही दूर राहतील. त्यामुळे बॅड कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते आणि गुड कोलेस्ट्रोलचे प्रमाण वाढते. त्यामुळे हृदयाच्या आरोग्यासाठी चणे खाणे फायदेशीर ठरेल. 

---------------------------------------------------------------
संकलन: श्री. स्वप्निल भिवाजी आव्हाड
सिन्नर, नाशिक.

Comments

Popular posts from this blog

शिवजयंती तिथीप्रमाणे का ?

लेख: आश्विन अमावास्येस लक्ष्मीपूजन हा सण साजरा केला जातो.

समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.