‘हे’ आहेत गाजर खाण्याचे फायदे

‘हे’ आहेत गाजर खाण्याचे फायदे

थंडीच्या दिवसात बाजारात भरपूर भाज्या, सॅलेड आणि फळे अगदी सहज उपलब्ध होतात. भाज्या आणि सॅलेड यांचा आहारात समावेश असल्यास आरोग्या उत्तम राहण्यास मदत होते. भाज्यांमुळे शरीरातील शक्ती वाढण्यास मदत होते. त्यातही थंडीत खाल्लेले अन्न सहज पचत असल्याने व्यायाम भरपूर करावा आणि आहारही पोषक घ्यावा. सॅलेड खाणे आरोग्यासाठी चांगले असते असे आपण अनेकदा ऐकतो पण गाजरामुळे शरीराला नेमके कोणते फायदे होतात याबाबत आपल्याला म्हणावी तितकी माहिती नसते. कधी गाजर हलवा आवडतो म्हणून तर कधी ताटात वाढले म्हणून इतकेच गाजर खाल्ले जाते. मात्र गाजराचा आहारात नियमित समावेश केल्यास त्याचा निश्चितच फायदा होतो. शक्तीवर्धक म्हणूनही गाजर उपयुक्त असते. पाहूयात काय आहेत गाजराचे फायदे….

१. गाजरामध्ये तंतूमय पदार्थ जास्त असल्याने पचनशक्ती सुधारण्यास मदत होते. याशिवाय गाजरात असणारे बिटा कॅरोटिन कॅन्सरला प्रतिबंधक ठरतं.

२. थंडीत गाजराचं सेवन केल्यानं शरीरात ऊर्जा टिकून राहण्यास मदत होते. त्यामुळे शक्ती टिकून राहते आणि आपण अधिक कार्यक्षम होतो.

३. साधारणपणे आपल्याकडे बाजारात गाजर सहज उपलब्ध होते. गाजराची पाने आपण खात नाही. पण गाजरापेक्षा त्याच्या पानांमध्ये जास्त प्रमाणात लोह असते. त्यामुळे अॅनिमिया दूर होतो.

४. गाजराचा रस आणि मध एकत्र करून त्याचे ज्यूस प्यावा. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

५. गाजरात ए व्हिटॅमिन जास्त प्रमाणात असते. त्यामुळे गाजर नियमित खाल्ल्यास चष्म्याचा नंबर कमी व्हायला मदत होते.

६. गाजरात कॅल्शियम, फायबर, व्हिटॅमिन सी, बी इत्यादी शरीराला आवश्यक असणारे घटक असतात. त्यामुळे हृदयरोग असणाऱ्यांच्या आहारात गाजर असायलाच हवे. तसेच ज्यांना नाही त्यांनीही नियमित गाजर खाल्ल्यास हृदयरोग होण्याची शक्यता कमी असते. त्यानं हृदयरोगावरही मात करता येते.

७. अनेकदा बाहेरही गाजराचा ज्यूस मिळतो. तो पिण्यासही हरकत नाही. फक्त त्याठिकाणी स्वच्छता आणि वापरण्यात येणाऱ्या गाजरांची गुणवत्ता तपासून पहायला हवी. त्यामुळे आरोग्यास फायदा होतो हे निश्चित.

Comments

Popular posts from this blog

शिवजयंती तिथीप्रमाणे का ?

लेख: आश्विन अमावास्येस लक्ष्मीपूजन हा सण साजरा केला जातो.

समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.