नाश्त्याला पोहे खाण्याचे '5' आरोग्यदायी फायदे
नाश्त्याला पोहे खाण्याचे '5' आरोग्यदायी फायदे
_व्यस्त जीवनशैलीमुळे आजकाल बाजारात मिळणार्या रेडी टू मेक नाश्त्याकडे आपण सहज वळतो पण असे पदार्थ खाणे आरोग्यास हितकारी असतीलच असे नाही. मग नाश्त्याला झटपट तयार होणारा आणि आरोग्यासही हितकारी पर्याय म्हणजे ‘पोहे’._
👉🏻 का आहेत पोहे पोषक ?
▪ पोह्यांमुळे शरीरात आयर्नची कमतरता किंवा अॅनिमिया जडण्याची शक्यता कमी होते. 100 ग्रॅम कच्च्या पोह्यातून शरीराला 20 mg आयर्न मिळते. लहान मुलांप्रमाणेच, गरोदर स्त्रिया तसेच नवमातांनी नाश्त्याला पोहे खाणे हितकारी आहे.
▪ आयर्नमुळे हिमोग्लोबिनची निर्मिती सुधारते तसेच रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण सुधारल्याने रोगप्रतिकारशक्तीदेखील सुधारते. पोहे बनवल्यानंतर त्यावर लिंबाचा रस पिळल्यास अधिक चांगल्या प्रकारे आयर्नचे शोषण होण्यास मदत होते.
▪ पोह्यांमध्ये भाज्या घातल्याने त्यातील व्हिटामिन,मिनरल्स व फायबरचे प्रमाण वाढते. आवडीनुसार त्यात मोड आलेली कडधान्य, सोयाबीन,शेंगदाणे किंवा उकडलेले अंड मिसळल्याने त्यात प्रोटीन्सची मात्रा वाढते. पोह्यांची पोषणता वाढण्यासाठी पांढर्या पोह्यांऐवजी लाल पोहे (हातसडीचे) वापरावेत
▪ वाटीभर पोह्यातून शरीराला मुबलक प्रमाणात कार्बोहायड्रेट्स मिळतात. त्यामुळे पोहे हा नाश्त्याचा उत्तम पर्याय आहे. कार्बोहायड्रेसमुळे शरीरात उर्जा निर्माण होण्यास मदत होते. त्यामुळे वेळी-अवेळी लागणार्या भूकेवर नियंत्रण मिळवण्यासाठी चिप्स किंवा बिस्कीटं खाण्याऐवजी पोहे फारच आरोग्यदायी आहेत.
▪ ग्ल्युटेनचे प्रमाण वाढू नये म्हणून अनेकजण गहू, बार्ली अशा धान्यांचा आहारातील समावेश कमी करतात. मात्र प्रत्यक्षात या धान्यांमुळे ग्लुटेनच्या प्रमाणात फारसा चढा-उतार होत नाही.
▪ मधुमेहींसाठी पोहे हा अत्यंत पोषक नाश्त्याचा पर्याय आहे. कारण पोह्यांचा आहारात समावेश केल्यास रक्तातील साखर हळूहळू वाढते. तसेच पोटभर पोहे खाल्ल्याने बराच वेळ भूकेवर नियंत्रण मिळवण्यास मदत होते. मधुमेहींनी पोह्यांची पोषकता वाढवण्यासाठी त्यात सोयाचा वापर करावा.
-------------------------------------------------------------------
✍🏻🖋 संकलन:- स्वप्निल आव्हाड
Comments
Post a Comment