पदार्थांतील ‘भेसळ’ कसे ओळखलं ?

पदार्थांतील ‘भेसळ’ कसे ओळखलं ?

वस्तूंची खरेदी विक्री योग्य दरात व ग्राहकाचे कुठलेही नुकसान न होता व्हावी या उद्देशाने जगभरातील ग्राहकांच्या रक्षणार्थ कार्यरत असणारा ‘ग्राहक संरक्षण कायदा’ हितकारक आहेच, त्याचा योग्य फायदा करुन घ्यायलाच हवा. तसेच, सामान्य पातळीवर कडधान्ये, मसाले यांमध्ये भेसळ करणा-या फसव्या विक्रेत्यांनाही शोधायला हवे, भेसळयुक्त पदार्थांचा आहारात सतत समावेश होत राहिल्यास अनेक घातक आजार जडतात व आरोग्याचे न भरुन निघणारे नुकसान होते.म्हणूनच, खाद्यपदार्थांत भेसळ करणा-या स्वार्थी दुकानदारांना दंड झालाच पाहिजे, आपण त्यांची फसवेगिरी मोठ्या कल्पकतेने समोर आणू शकतो. पुढील टिप्स तुम्हाला पदार्थातील भेसळ ओळखण्यास मदत करतील.

🍄 लाल तिखट : तिखटाचा रंग लाल असल्याने त्यामध्ये विटांची पूड किंवा कृत्रिम रंग मिसळला जातो. ही भेसळ ओळखण्यासाठी तिखटामध्ये पाणी टाकून ठेवावे व तिखट वरील बाजूस आल्यास शुद्ध व तळाला गेल्यास भेसळयुक्त आहे, असे समजावे.

🍄 हळद : बहुतांश पदार्थांत उपयुक्त ठरणा-या हळदीत मेटॅलिन येलो नावाचे रसायन मिसळले जाते, ज्यामुळे कर्करोग होण्याचा संभव असतो. या घातक रसायनाची भेसळ ओळखण्यासाठी हळदीद हायड्रोक्लोरिक ऍसिड व पाण्याचे समप्रमाणात काही थेंब टाकावेत. जर, हळदीचा रंग गुलाबी किंवा जांभळा झाला तर भेसळ आहे असे समजावे.

🍄 मोहरी : मोह-यांमध्ये अर्जेमोनेच्या बियांची भेसळ केली जाते. मोहरीच्या आतमध्ये पिवळा रंग दिसतो, तर अर्जेमोनेच्या बियांमध्ये पांढरा रंग. या फरकामुळे आपण मोहरीतील भेसळ ओळखू शकतो.

🍄 दालचिनी : गरम मसाल्यातील महत्त्वाचा घटक असणा-या दालचिनीत पेरुच्या झाडाची साल वापरली जाते. दालचिनी ओळखण्यासाठी ती हातावर घासून पाहा, हाताला रंग न दिसल्यास ती भेसळयुक्त आहे असे समजावे.

🍄 काळी मिरी : आपण पपईची बी कटाक्षाने टाळतो, मात्र याच बियांना काळा रंग देऊन काळी मिरीमध्ये मिसळल्या जातात. ही भेसळ ओळखळ्यासाठी काळीमिरी पाण्यात टाकावी, ती वर तरंगल्यास अशुद्ध व बुडल्यास शुद्ध आहे असे समजावे.

🍄 तांदूळ : प्लॅस्टिक किंवा बटाट्यांपासून बनवलेला तांदूळ वापरुन भेसळ केली जाते, यांच्यामुळे पोटासंबंधीचे आजार उद्भवू शकतात. यासाठी भात शिजताना निराळाच गंध आल्यास भेसळ आहे असे समजावे.

🍄 खवा : दुधामध्ये जशी पाण्याची, तशी खव्यामध्ये स्टार्चची भेसळ केली जाते. ती ओळखण्यासाठी प्रथम खवा टेस्ट ट्यूबमध्ये भरुन त्यामध्ये २० एमएल पाणी टाकावे. मिश्रण उकळवून घ्यावे व थंड झाल्यावर त्यामध्ये आयोडीन मिसळावे. आता खवा निळा झाल्यास भेसळ आहे असे समजावे.

🍄 सफरचंद : डॉक्टरांना दूर ठेवणा-या सफरचंदाला चकाकी येण्यासाठी त्यावर मेणाचा पातळ थर चढवला जातो. ही फसवणूक ओळखण्यासाठी चाकूद्वारे सफरचंदावर ओरखडे ओढून पाहावेत.

🍄 हिरवे मटार : मटार आणखी हिरवेगार दिसावेत यासाठी, त्यामध्ये आरोग्यसाठी हानिकारक असे मेलाकाईट ग्रीन हे रसायन मिसळले जाते. भेसळ ओळखण्यासाठी मटारचे दाणे काही वेळ पाण्यात बुडवून ठेवावेत, पाणी हिरवे झाल्यास भेसळ आहे असे समजावे.

🍄 कॉफी : चिकोरी हा पदार्थ कॉफीमध्ये मिसळला जातो. एका ग्लासाल पाणी घेऊन कॉफीची पावडर त्यामध्ये टाकावी. कॉफी पाण्यावर तरंगते, तर चिकोरी काही सेकंदाता तळाला जाते.

🍄 केशर : मक्याचे केस वाळवून ते केशरामध्ये मिसळले जातात. मक्याचे केस ओढून पाहिल्यास तुटतात, केशर सहसा तुटत नाही.

🍄 मध : मधामधील भेसळ म्हणजे साखरेचे पाणी. ही भेसळ ओळखण्यासाठी कापसाची एक वात मधात भिजवून ती काडीने पेटवा. शुद्ध मध छान जळतो, तर पाणी मिसळले असल्याल वात पेटत नाही किंवा पाण्याचा चरचर आवाज येतो.

Comments

Popular posts from this blog

समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.

मूलगीची तक्रार - कविता

शिवजयंती तिथीप्रमाणे का ?