रात्री का चमकतात प्राण्यांचे डोळे? जाणून घ्या यामागचं रंजक उत्तर!

रात्री का चमकतात प्राण्यांचे डोळे? जाणून घ्या यामागचं रंजक उत्तर!

तुम्ही रात्रीची मांजर बघितली असेल,अंधारात काळ्या मांजरीचे शरीर दिसत नाही,परंतु तिच्या काजव्यांसारखे चमकत असणाऱ्या डोळ्यांना बघून प्रत्येकजण घाबरतो. मांजरी सारखेच सिंह, वाघ, चित्ता, बिबळ्या वाघ यांसारख्या कित्येक इतर प्राण्यांचे डोळे रात्रीचे चमकतात. हे चमकणारे डोळे पाहून तुमच्याही मनात कधी न कधी असा प्रश्न आला असेल की या प्राण्यांच्या डोळ्यांमध्ये अशी काय विशेषता आहे की त्यांचे डोळे रात्री चकाकतात? अजूनही तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर सापडलं नसेल तर आज मात्र तुमचा तो शोध इथे संपला, कारण या लेखाद्वारे तुम्हाला वरील प्रश्नाच उत्तर मिळणार आहे.

ज्या प्राण्यांचे डोळे चमकतात,त्या प्राण्यांच्या डोळ्यांमध्ये एक विशेष प्रकारच्या मणिभीय पदार्थाचा (Crystalline Sb-stance)  पातळ थर असतो. हा पातळ थर डोळ्यांवर पडणारा प्रकाश प्रतिबिंबित करतो. हा थर ठीक तसेच काम करते जसे आरशावर सूर्याचे किरण पडल्यावर तो चमकायला लागतो.

मांजरीच्या डोळ्यांवर केलेल्या एका प्रयोगावरून हे समजले आहे की, तिच्या डोळ्यांच्या पडद्यामागे एक चमकदार पदार्थाचा थर असतो, ज्याला ल्यूमिनीयस टेपटम (Luminous tepetum) म्हणतात. हा पदार्थ प्रकाशाला प्रतिबिंबित करतो. ह्या थरामुळे खूप कमी प्रकाशात सुद्धा मांजर कोणतीही गोष्ट अगदी सहज बघू शकते. ज्या प्राण्यांचे डोळे रात्रीचे चमकतात, ते अंधारात चांगल्या प्रकारे बघू शकतात.

ह्याव्यतिरिक्त अजून एक विशेष गोष्ट म्हणजे, ज्या प्राण्यांचे डोळे रात्रीचे चमकतात, त्या सर्वांची चमक एकसारखी नसते. ह्याचे कारण हे आहे की, ज्या प्राण्यांच्या डोळ्यांमध्ये रक्ताची नसे जास्त असतात, त्यांच्या डोळ्यांची चमक लाल रंगाची असते. दुसरीकडे ज्या प्राण्यांच्या डोळ्यांमध्ये रक्ताची नसे कमी असतात, त्यांचे डोळे पांढरे किंवा थोडे पिवळ्या रंगांचे असतात.

Comments

Popular posts from this blog

शिवजयंती तिथीप्रमाणे का ?

लेख: आश्विन अमावास्येस लक्ष्मीपूजन हा सण साजरा केला जातो.

समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.