मोबाईल अॅक्टिव्हिटी रेकॉर्ड करण्याचा सोपा उपाय...

मोबाईल अॅक्टिव्हिटी रेकॉर्ड करण्याचा सोपा उपाय...

आपल्या फोनच्या सर्व अॅक्टीव्हीटी रेकॉर्ड झाल्या असत्या तर किती चांगले झाले असते, असे तुम्हालाही वाटते का? तर मग आता तुमची ही इच्छाही पूर्ण होणार आहे. आता तुम्ही तुमच्या फोनच्या अॅक्टीव्हीटी रेकॉर्ड करु शकता. गुगल प्ले स्टोरवर अनेक अॅप्स उपलब्ध आहेत ज्याच्या मदतीने तुम्ही फोनची स्क्रीन रेकॉर्ड करु शकता. DU Recorder, AZ Screen Recorder, HD Screen Recorder आणि Rec.(Screen Recorder) यांसारख्या अॅप्सच्या माध्यमातून तुम्ही स्मार्टफोनची स्क्रीन रेकॉर्ड करु शकतात. या अॅप्सपैकी Rec.(Screen Recorder)हे अॅप कसे काम करते जाणून घेऊया...

स्टेप १ गुगल प्ले स्टोरवर जावून Rec. Screen Recorder अॅप डाऊनलोड करा.

स्टेप २ अॅप ओपन केल्यावर तुम्हाला अनेक पर्याय दिसतील. यात व्हिडिओ साईज, बिट रेट, ड्युरेशन आणि फाईल नेम दिसेल.

स्टेप ३ अॅपच्या सेटींगनंतर रेकॉर्ड बटनावर क्लिक करा.

स्टेप ४ अॅप तुमच्याकडून फोटो, मीडिया आणि फाईल्स एक्सेस करण्याची परवांगी मागेल. त्यात ओके वर क्लिक करा.

स्टेप ५ अॅप तुमच्याकडून तुमच्या स्क्रीनवरील प्रत्येक अॅक्टिव्हिटी रेकॉर्ड करण्याची परवानी मागेल. त्यात Start Now बटणावर क्लिक करा.

स्टेप ६ अॅप तुमच्या फोनच्या स्क्रीनवरील सर्व अॅक्टिव्हिटी रेकॉर्ड करण्यास सुरूवात करेल.

Comments

Popular posts from this blog

समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.

मूलगीची तक्रार - कविता

शिवजयंती तिथीप्रमाणे का ?