चिडचिडेपणा तुम्ही असा टाळू शकता
📣चिडचिडेपणा तुम्ही असा टाळू शकता
काही लोकांमध्ये वयानुसार चिडचिडेपणा कमी व्हायला पाहिजे, पण तो आणखी वाढत जातो. मात्र यासाठी सतत कामात असणे गरजेचे आहे. तसेच काही काही व्यायाम देखील आहेत.
▪️ बागकाम केल्याने हात खराब होतील या विचाराने अनेकजण हे काम टाळतात. मात्र बागकाम केल्याने मेंदूकडून येणाऱ्या एका विशिष्ट केमिकलमध्ये वाढ होते. यामुळे चिडचिडेपणा कमी होण्यास मदत होते.
▪️ मडिटेशन केल्याने तुमचं लक्ष तुमच्या श्वासावर केंद्रित राहतं. मेडिटेशन करणं केव्हाही उत्तम. परिणामी चिडचिडेपणा हा कमी होतो. यामुळे डोक्यातील विचार आपोआप निघून जातात.
▪️ मसाज करणं हात, पाय, पाठ यामधील स्नायू आणि टिश्यूंसाठी उत्तम असतं. यामुळे स्नायू ताणले जातात. परिणामी ताण आणि चिडचिडेपणा येत नाही.
▪️ झोपण्यापूर्वी टीव्ही किंवा कॉम्प्युटरवर काम करू नये. तसंच नियमित व्यायाम केल्याने देखील शांत झोप लागण्यास मदत होते. जर तुम्हाला दररोज पुरेशी झोप मिळत नसेल तर चिडचिडेपणा वाढण्याची शक्यता असते.
▪️ योग हा मेडिटेशनचाच एक भाग आहे. योगामध्ये असणाऱ्या काही पद्धती किंवा आसनं यामुळे शरीरातील स्नायू आणि टिश्यू ताणले जातात. यामुळे हृदयाचे ठोके आणि रक्तदाब नियंत्रणात राहून चिडचिडेपणा कमी होण्यास मदत होते.
-------------------------------------------------------
Comments
Post a Comment