ताण दूर करण्यासाठी ‘हे’ चार उपाय करून पाहा
ताण दूर करण्यासाठी ‘हे’ चार उपाय करून पाहा
ताण ही अनेकांना भेडसावणारी समस्या आहे. ताणातून अनेकदा नैराश्य येतं. ताण जितका अधिक तितकंच अधिकाअधिक नैराश्य वाढत जातं. सहजीवनातील समस्या, दैनंदिन कामाचा आणि नातेसंबंधांमधील तणाव, नोकरीच्या समस्या, भविष्याचे, मुलाबाळांसाठीचे ‘प्लॅनिंग’, करिअर यातला समतोल साधता साधता माणूस कधी कधी कोलमडून पडतो. प्रत्येक वयातल्या ताणतणावांची कारणे ही काही प्रमाणात वेगळी आहेत, या कारणांचा नीट उभ्यास केला तर ताणाची समस्या दूर होऊ शकते, त्यासाठी प्रत्येकवेळी उपचार घेण्याची गरज आहेच असं नाही, स्वत:चीच मदत घेऊन सकारात्मक दृष्टिकोनाने काही साधे उपाय केल्यास ताणाचे व्यवस्थापन नक्कीच करता येते.
पुस्तक वाचणं : ‘वाचाल तर वाचाल’ हा नियम येथेही लागू होता, तुम्हाला तणावातून बाहेर यायचं असेल तर तुम्ही पुस्तकांची मदत येऊ शकता. सकारात्मक, प्रेरणादायी पुस्तक वाचली की आपसूकच मनावरचा ताण कमी व्हायला मदत होते.
गाणी : तणाव दूर करण्यासाठी गाणी ऐकणं उत्तम पर्याय आहे हे एका संशोधनातून सिद्ध झालं आहे. नैराश्य आल्यासारखं वाटत असेल तर गाणी ऐकून तुम्ही मूड बुस्ट करू शकता.
चित्रकला : ताण दूर करण्यासाठी चित्रकला हा देखील उत्तम उपाय असू शकतो. जर तुम्हाला चित्र काढायला येत नसेल तरीही हरकत नाही पण रंगीत खडू घेऊन कागदावर नुसत्या रेघोट्या ओढल्या तरी हळूहळू हलकं वाटू लागलं.
हस्तकला : ताण आला असल्यास ओरिगामी करून तुम्ही मन वळवू शकता. टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू किंवा युट्युबवरचे ट्युटोरिअल पाहून तुम्ही डोक्यावरचा ताण हलका करू शकता.
Comments
Post a Comment