"शेतकऱ्यांचे हाल"
कविता
"शेतकऱ्यांचे हाल"
विराट १७ करोडात गेला,
धोनी १५ करोडात गेला,
अरे जो जगाचा पोशिंदा आहे
तो झाडावर लटकुन मेला ॥१॥
भारत कृषिप्रधान देश आहे की क्रिकेटप्रधान,
हाच मोठा प्रश्न पडतो.
जगाला काय मेला काय,
सांगा कुणाला फरक पडतो ॥२॥
अरे एखादी पडझड तुम्ही
वावरात घेऊन पहा.
शेतकऱ्यांची जिंदगी
एकतरी दिवस जगून पहा. ॥३॥
खेळाडूसारखे करोड नको
फक्त पीकमालाला भाव द्या,
कृषिरत्न, कृषिभूषण नको
फक्त शेतकऱ्याला मान द्या ॥४॥
संकलन: श्री. स्वप्निल भिवाजी आव्हाड
सिन्नर, नाशिक.
मोबा.: +९१७७०९७६१८५२
Comments
Post a Comment