๐Ÿน เคฅंเคกाเคˆ ๐Ÿน Recipe

😋 Recipe🌴

         🍹 थंडाई🍹

*थंडाई*- ‘थंडाई’ हे एक असं थंडपेय आहे जे बदाम, वेलची, केशर, डांगराच्या बीया, गुलाबाच्या पाकळ्या वगैरे टाकून बनविले जाते. हे पेय खासकरुन माहाशिवरात्री आणि होळीला पितात.

जिन्नस
१५० ग्रॅम बदाम
२० ग्रॅम छोटी वेलची
१ लहान चमचा केशर
१/२ कप डांगराच्या सोललेल्या बिया
१० ते १२ काळी मिरी
१ कप गुलाबची पाने
१/२ कप खसखस
१ किलो साखर
१/२ लि. पाणी
१ चमचा पोटेशियम मेटा बाय सल्फेट

पाककृती
बदाम पाण्यात ५ ते ६ तास भिजवून सोलून घ्यावेत.
आता सर्व साहित्य मिक्सरमध्ये घालून कोरडे वाटून घ्यावे.
१/२ लि. पाण्यात ते मिश्रण ८ ते १० तास भिजवून ठेवावे. नंतर याला बारीक वाटून गाळून घ्यावे. यात साखर घालून गरम करावे.
पाक घट्ट झाल्यावर चुलीवर उतरून थंड करावे व नंतर पोटेशियम मेटा बाय सल्फेट मिसळून बाटलीत भरून घ्यावे
सर्व्ह करताना यात दूध टाकून वर बर्फाचा चुरा टाकावा.

Comments

Popular posts from this blog

เคธเคฎเคฐ्เคฅ เคฐाเคฎเคฆाเคธ เคธ्เคตाเคฎींเคšी เค…เคคिเคถเคฏ เคธुंเคฆเคฐ เคฐเคšเคจा. เคนी เฅจเฅฆ เค•เคกเคตी เคฎ्เคนเคฃเคœे เฅจเฅฆ เคฐเคค्เคจे เค†เคนेเคค.

เคฎूเคฒเค—ीเคšी เคคเค•्เคฐाเคฐ - เค•เคตिเคคा

เคถिเคตเคœเคฏंเคคी เคคिเคฅीเคช्เคฐเคฎाเคฃे เค•ा ?