๐Ÿ‘Œ เคœเคฎिเคจीเคตเคฐ เคฌเคธूเคจ เคœेเคตเคฒे เคชाเคนिเคœे!

👌 जमिनीवर बसून जेवले पाहिजे!

Good Habbit

सहसा लोक डायनिंग टेबल किंवा सोफ्यावर बसुन जेवतात. पण असे जेवणे आपल्या आरोग्यासाठी हितकारक नाही. आपल्या पुर्वंजाप्रमाणे आपणही जमिनीवर मांडी घालुन बसुनच जेवले पाहीजे. त्याचे अनेक फायदे आहेत त्यावर एक नजर टाकुयात...

1) जमिनीवर ताट असल्याने जेवणाचा घास घेण्यासाठी वाकावे लागते. या सतत होणाऱ्या शारीरिक हालचालीमुळे पोटाजवळील स्नायूंना चालना मिळते व पचनाची क्रियादेखील सुधारते.

2) टेबलापेक्षा जमिनीवर बसून जेवल्याने, जेवणाचा वेग मंदावतो व पोट आणि मेंदूतील समन्वयता सुधारते. परिणामी अतिप्रमाणात खाण्याची वृत्ती कमी होते व वजनही काबूत राहते.

3) जेवताना पद्मासनात बसल्याने, पाठीचे, कमरेतील तसेच पोटाजवळील स्नायूंवर ताण आल्याने पचनसंस्थेचा मार्ग सुधारतो. पोटाजवळील स्नायूंवर ताण आल्याने शरीर लवचिक व आरोग्यदायी बनण्यास मदत होते.

4) जमिनीवर बसून जेवल्याने मेंदू शांत होतो व तुमचे सारे लक्ष जेवणाकडेच राहते. मनाची अस्थिरता कमी होते.

5) दिवसातील किमान एका जेवणाचा आपल्या कुटूंबासोबत जमिनीवर बसून जरूर आनंद घेतला पाहिजे. कारण यामुळे नकळत कुटूंबातील सदस्यांशी जवळीक वाढते. मन शांत व प्रसन्न होते.

6) जमिनीवर बसून जेवताना पाठीचा कणा ताठ राहतो व पोट, खांदा व पाठीच्या स्नायूंची योग्य प्रमाणात हालचाल होते.

7) जमिनीवर बसून जेवल्याने स्नायूंबरोबर सांध्यांची लवचिकता देखील वाढते.

8) जेवताना जमिनीवर मांडी घालून बसल्यामुळे मन, मेंदू व परिणामी शरीरातील त्रास कमी होतात.

9) खुर्चीवर बसण्याऐवजी जमिनीवर बसून जेवल्याने शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो. तसेच पचनही सुधारते.

Comments

Popular posts from this blog

เคธเคฎเคฐ्เคฅ เคฐाเคฎเคฆाเคธ เคธ्เคตाเคฎींเคšी เค…เคคिเคถเคฏ เคธुंเคฆเคฐ เคฐเคšเคจा. เคนी เฅจเฅฆ เค•เคกเคตी เคฎ्เคนเคฃเคœे เฅจเฅฆ เคฐเคค्เคจे เค†เคนेเคค.

เคฎूเคฒเค—ीเคšी เคคเค•्เคฐाเคฐ - เค•เคตिเคคा

เคถिเคตเคœเคฏंเคคी เคคिเคฅीเคช्เคฐเคฎाเคฃे เค•ा ?