चेहऱ्यावरील खड्डे कमी करण्यासाठी घरगुती उपाय!

🤔 चेहऱ्यावरील खड्डे कमी करण्यासाठी घरगुती उपाय!

वयात येताना शरीरात होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे त्वचेवर अ‍ॅक्ने, व्हाईटहेड्स, ब्लॅकहेड्सचा त्रास उद्भवू शकतो. पिंपल्सपासून सुटका मिळवली तरीही त्याचे डाग आणि खड्डे यामुळे त्वचा खराब आणि निस्तेज दिसायला लागते. चेहऱ्यावरील खड्ड्यांची समस्या आटोक्यात ठेवण्यासाठी काही घरगुती उपाय जाणून घेऊयात... 

1) बेसनामध्ये दूध आणि लिंबू मिसळा. या मिश्रणाची पेस्ट त्वचेवर लावल्यास चेहऱ्यावरील खड्ड्यांचा आकार कमी होण्यास मदत होते.

2) तेलकट त्वचा असणाऱ्यांसाठी लिंबूरस आणि मधाचे मिश्रण चेहऱ्यावर चोळल्यास फायदा होतो. दिवसातून 2-3 वेळेस हा उपाय नियमित केल्यास त्वचा मुलायम होण्यास मदत होते. 

3) चेहऱ्यावर नियमित कोरफडाचा गर आणि व्हिटॅमिन ई चे मिश्रण लावल्यास चेहऱ्यावर ग्लो येण्यास मदत होईल. रात्री हे मिश्रण चेहऱ्याला लावून झोपल्यास त्वचेवरील खड्ड्यांचा त्रास कमी होण्यास मदत होते. सोबतच कांजण्यांचे डाग दूर करण्यासाठीही हा उपाय फायदेशीर ठरतो.

4) मुलतानी माती, लिंबाचा रस, गुलाबपाणी हे मिश्रण एकत्र करून त्वचेवर लावल्यास त्वचा मुलायम होण्यास मदत होते. सोबतच चेहऱ्यावर खड्ड्यांचा त्रास असल्यास तो आटोक्यात राहतो.

Comments

Popular posts from this blog

समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.

मूलगीची तक्रार - कविता

शिवजयंती तिथीप्रमाणे का ?