ЁЯУЦрдордиाрдЪे рд╢्рд▓ोрдХ

📖मनाचे श्लोक

नव्हे कर्म ना धर्म ना योग काही।
नव्हे भोग ना त्याग ना सा़ंग पाही॥

म्हणे दास, विश्वास, नामी धरावा।
प्रभाते मनी राम चि‌ंतीत जावा॥

◼वरील श्लोकात, संत रामदास अत्यंत साध्या-सरळ भाषेत भगवंताच्या नामाचे महत्व सांगत आहेत. ते म्हणतात, मना तुला कर्म, धर्म, योग यांची चिंता करण्याची गरज नाही.

◼भोग-त्याग, सांग (विधी-निषेध) यांचा ही विचार करू नकोस. फक्त भगवंताच्या नामावर विश्वास ठेवून नित्य नामस्मरण करत जा.

◼रोज सकाळी रामाचे चिंतन करत जा. हे केल्यावर तुला भगवत्प्राप्तीसाठी बाकी कुठल्याच साधनाची गरज नाही!

Comments

Popular posts from this blog

рд╕рдорд░्рде рд░ाрдорджाрд╕ рд╕्рд╡ाрдоींрдЪी рдЕрддिрд╢рдп рд╕ुंрджрд░ рд░рдЪрдиा. рд╣ी реиреж рдХрдбрд╡ी рдо्рд╣рдгрдЬे реиреж рд░рдд्рдиे рдЖрд╣ेрдд.

рдоूрд▓рдЧीрдЪी рддрдХ्рд░ाрд░ - рдХрд╡िрддा

рд╢िрд╡рдЬрдпंрддी рддिрдеीрдк्рд░рдоाрдгे рдХा ?