जेवणानंतर लगेच या गोष्टी करणं तुमच्यासाठी धोकादायक!

जेवणानंतर लगेच या गोष्टी करणं तुमच्यासाठी धोकादायक!

१) लगेच झोपू नये
जेवल्यानंतर लगेच झोपल्यामुळे गॅस आणि आतड्यांना त्रास व्हायची शक्यता वाढते. त्यामुळे झोपण्यासाठी थोडा वेळ घ्या. थोडावेळ फिरून या.

२) सिगारेट ओढू नये
सिगारेटमुळे हृदय आणि श्वसनासंबंधी आजार होतात. जेवल्यानंतर लगेच सिगरेट प्यायल्यामुळे कॅन्सरचा धोकाही मोठ्याप्रमाणावर वाढतो.

३) जेवल्यानंतर लगेच फळं खाऊ नये
जेवणाबरोबरच तुम्ही फळं खात असाल तर या फळांचं पोषण पूर्ण मिळत नाही. ही फळं पोटामध्येच चिटकून राहतात आणि आतड्यांपर्यंत पोहोचत नाहीत.

४) चहा पिऊ नका
चहापत्तीमध्ये सर्वाधिक आम्लाचं प्रमाण असतं, यामुळे प्रोटीनच्या पचनावर परिणाम होतो. जेवल्यानंतर लगेच चहा पिणं टाळा.

५) लगेच आंघोळ करु नये
आंघोळ करताना पाण्यामुळे शरीरावरील रक्ताचा संचार वाढतो, याचा परिणाम पोटावर होतो आणि पचनक्रियाही त्यामुळे प्रभावित होते. जेवणानंतर लगेच आंघोळ करणे यामुळे टाळावे.

Comments

Popular posts from this blog

समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.

मूलगीची तक्रार - कविता

शिवजयंती तिथीप्रमाणे का ?