๐Ÿ‘ช เค†เคœ 'เคœाเค—เคคिเค• เค•ुเคŸुंเคฌ เคฆिเคตเคธ'; เคเค•เคค्เคฐ เค•ुเคŸुंเคฌाเคธाเค ी 'เคนे' เค†เคตเคถ्เคฏเค•!

👪 आज 'जागतिक कुटुंब दिवस'; एकत्र कुटुंबासाठी 'हे' आवश्यक!

हल्ली विभक्त कुटुंब पद्धतीमुळे जागतिक कुटुंब दिनाला विशेष महत्त्व आले आहे. 15 मे 1994 रोजी युनायटेड नेशन्समध्ये सर्वप्रथम जागतिक कुटुंब दिन साजरा करण्यात आला होता. मागच्या काही काळात विभक्त कुटुंबाची समस्या भारतात मोठ्या प्रमाणात वाढली आहे. चला तर आज जागतिक कुटुंबदिनाच्या निमित्ताने आपल्या कुटुंबाशी कनेक्ट राहण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी जाणून घेऊयात…

1) सध्या मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही यांसारख्या उपकरणांनी आपल्या आयुष्याचा मोठा भाग व्यापून टाकला आहे. एकतर आपण फार कमी वेळ घरात असतो. त्यात या उपकरणांमुळे आपण घरातील व्यक्तींना वेळ देत नाही. त्यामुळे घरात आल्यावर मोबाईल, कॉम्प्युटर, टीव्ही ही उपकरणे बंद ठेवण्याचा प्रयत्न करा.

2) तुम्हाला आपले कुटुंब एकत्रित हवे असेल तर सर्वांना आवडेल, रुचेल असा एखादा छंद जोपासण्याचा प्रयत्न करा. यामध्ये तुम्ही एकत्रितपणे सायकलिंग करु शकता, एकत्रितपणे एखादे पुस्तक वाचू शकता, सगळ्यांना आवडतील अशी गाणी एकत्रितपणे ऐकू शकता.

3) घरातील सर्वांनी किमान सकाळचा नाष्ता किंवा रात्रीचे जेवण एकत्रितपणे करण्याचा प्रयत्न करावा. त्यामुळे दिवसभरातील सर्वांच्या आयुष्यातील घडामोडींबद्दल माहिती होते.

4) महिन्यातील एक दिवस सर्वांच्या वेळा बघून अर्धा दिवस किंवा पूर्ण दिवसाच्या आऊटींगला जाण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुमचा एकमेकांमधील संवाद वाढण्यास मदत होईल.

5) मोकळ्या वेळात तुमच्या मुलांशी गप्पा मारा. त्यांना त्यांच्या शाळेतील, कॉलेजमधील गोष्टी, मित्रमैत्रीणींविषयीच्या गोष्टी विचारा. त्यानंतर तुमच्या लहानपणीच्या गोष्टीही शेअर करा. त्यामुळे मुलांना वेगळ्या गोष्टींची माहिती होईल.

Comments

Popular posts from this blog

เคธเคฎเคฐ्เคฅ เคฐाเคฎเคฆाเคธ เคธ्เคตाเคฎींเคšी เค…เคคिเคถเคฏ เคธुंเคฆเคฐ เคฐเคšเคจा. เคนी เฅจเฅฆ เค•เคกเคตी เคฎ्เคนเคฃเคœे เฅจเฅฆ เคฐเคค्เคจे เค†เคนेเคค.

เคฎूเคฒเค—ीเคšी เคคเค•्เคฐाเคฐ - เค•เคตिเคคा

เคถिเคตเคœเคฏंเคคी เคคिเคฅीเคช्เคฐเคฎाเคฃे เค•ा ?