๐Ÿ˜Š เคœाเค—เคคिเค• เคนाเคธ्เคฏ เคฆिเคจ; เคนเคธा เค†เคฃि เคนเคธเคตเคค เคฐเคนा! ๐Ÿ˜ƒ

😊 जागतिक हास्य दिन; हसा आणि हसवत रहा!

आज जागतिक हास्य दिन. दरवर्षी मे महिन्यातील पहिल्या रविवारी जागतिक हास्य दिन साजरा केला जातो. हसणे हे अनेक रोगांवर गुणकारी ठरू शकते. नियमित हसणे स्वभाव आणि आरोग्य दोन्हीसाठी चांगले आहे. चला तर आज आरोग्याच्या दृष्टीने हसण्याचे महत्वपूर्ण फायदे पाहुयात...

▫ मनमोकळेपणाने हसल्याने शरीरात एंडोर्फिस हार्मोन सक्रिय होतात. ज्यामुळे खाण्याची इच्छा किंवा लालसा नियंत्रणात राहते. त्यामुळे आहाराचे संतुलन ठेवण्यास मदत होते.

▫ चेहऱ्यावरील स्नायू सक्षम ठेवणे आणि रक्तसंचार वाढवण्यात हसण्याची अतिशय महत्त्वाची भूमिका असते.

▫ हसल्यामुळे शरीरात एंडोर्फिस हा फील गुड करणारा घटक क्रियाशील झाल्याने विविध भागात होत असलेले दुखणे कमी होते. हा रासायनिक घटक पेन किलरप्रमाणे काम करत असतो.

▫ शरीराची रोग प्रतिकारक क्षमता आणि संसर्गासोबत लढणारी प्रणाली आनंदी राहिल्याने सक्षम होते. ज्यामुळे विविध संसर्ग आणि अ‍ॅलर्जीच्या प्रभावात येण्यापासून बचाव होतो.

▫ एकटे राहण्यापेक्षा जे लोक मिळून मिसळून राहतात. ते तीस टक्के जास्त हसतात. यासाठी नेहमी मित्रांसोबत राहा. त्यांच्यासोबत चांगला आणि आनंदमय वेळ घालवा.

▫ एका संशोधनानुसार 10 मिनिटे व्यायाम केल्याने जेवढी हृदयगती तीव्र होते. तेवढ्या हृदयगतीसाठी एक मिनिट हसणे पुरेसे ठरते.

▫ नेहमी हसत राहिल्याने शरीरातील उर्जेच्या स्तरात वाढ होते, त्यामुळे कामावर लक्ष केंद्रित करणे सोपे होते आणि कामाच्या गुणवत्तेत वाढ होते.

▫ हसमुख राहिल्याने व्यक्तीच्या मनात चांगले विचार येतात आणि त्याचे वागणे सकारात्मक राहते. हसणाऱ्या आणि नेहमी उत्साही राहणाऱ्या व्यक्तीकडे लोक आकर्षित होतात.

▫ आनंदी आणि हसत राहिल्याने तणाव वाढत नाही. त्याचप्रमाणे चटपटीत खाण्याची इच्छा देखील होत नाही परिणामी वजन नियंत्रणात ठेवण्यास हसणे मदत करते.

Comments

Popular posts from this blog

เคธเคฎเคฐ्เคฅ เคฐाเคฎเคฆाเคธ เคธ्เคตाเคฎींเคšी เค…เคคिเคถเคฏ เคธुंเคฆเคฐ เคฐเคšเคจा. เคนी เฅจเฅฆ เค•เคกเคตी เคฎ्เคนเคฃเคœे เฅจเฅฆ เคฐเคค्เคจे เค†เคนेเคค.

เคฎूเคฒเค—ीเคšी เคคเค•्เคฐाเคฐ - เค•เคตिเคคा

เคถिเคตเคœเคฏंเคคी เคคिเคฅीเคช्เคฐเคฎाเคฃे เค•ा ?