पित्त आणि बद्धकोष्ठतेचा त्रास दूर करण्यासाठी असा करा बडीशेपचा वापर🧐

🙂 Health katta🙃

पित्त आणि बद्धकोष्ठतेचा त्रास दूर करण्यासाठी असा करा बडीशेपचा वापर🧐

🔮 भारतीय खाद्यसंस्कृतीचं खास वैशिष्ट्य म्हणजे 'बडीशेप'. आहारात बडीशेपचा वापर हा केवळ पदार्थांची  चव वाढवण्यासाठी केला जात असला तरीही त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. बडीशेपमध्ये आयर्न, फायबर, कॅल्शियम घटक मुबलक प्रमाणात असतात. धावपळीची जीवनशैली आणि  आहारात असलेला पोषक घटकांचा अभाव यामुळे अनेकांना बद्धकोष्ठता, त्यामुळे वाढणारी मूळव्याधीची समस्या, पित्त असे आजारांचा सामाना करावा लागतो.

🤷‍♀ बद्धकोष्ठता आणि पित्तावर कसा कराल उपाय ?
चूकीच्या आहाराच्या सवयींमुळे बद्धकोष्ठता आणि पित्ताचा त्रास वाढतो. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी बडीशेपाची पूड बनवा. ग्लासभर गरम पाण्यामध्ये बडीशेप पूड मिसळा. या मिश्रणामध्ये काळं मीठ मिसळा. सकाळी उठल्यावर हे मिश्रण नियमित प्यायल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होण्यास मदत होते. 

वजन घटवण्यासाठी बडीशेपचा कसा कराल वापर ?🤔
वजन घटवण्यासाठीही बडीशेपाची पूड फायदेशीर ठरते. याकरिता रात्री झोपण्यापूर्वी चमचाभर बडीशेप खा. त्यावर ग्लासभर कोमट पाणी प्या. या उपायाने वजन घटवण्यास मदत होते.

👁 डोळ्यांच्या आरोग्यासाठीही बडीशेप फायदेशीर
डोळ्यांच्या आरोग्यासाठीही बडीशेप फायदेशीर आहे. बडीशेप आणि बदाम मिसळून खाल्ल्याने डोळ्यांचे आरोग्य सुधारते.

Comments

Popular posts from this blog

समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.

मूलगीची तक्रार - कविता

शिवजयंती तिथीप्रमाणे का ?