आरोग्याच्या या समस्यांवर उपयुक्त ठरेल बटाट्याचा रस...😇

🙂 Health Katta🙃

आरोग्याच्या या समस्यांवर उपयुक्त ठरेल बटाट्याचा रस...😇

😃 बटाट्याच्या रसाचे फायदे...

१. कच्चा बटाट्याच्या रसात anti-inflammatory म्हणजेच दाहशामक गुणधर्म असतात. त्याचबरोबर कोपर, मान, पाठ, खांदे आणि गुडघ्याच्या दुखण्यावर हा एक परिमाणकारक नैसर्गिक उपाय आहे. तसंच सांधेदुखीवर आराम मिळतो.

२. कच्चा बटाट्याच्या रसात फायबर भरपूर प्रमाणात असते. बटाट्याचा रस डिटॉक्सफायिंग एजन्ट म्हणून काम करतो. त्याचबरोबर किडनी, पित्ताशय व यकृताचे कार्य सुधारते. या रसात कोलेस्ट्रॉल नसतात. याउलट शरीरातील अतिरिक्त कोलेस्ट्रॉल बाहेर टाकून पेशींना होणारा रक्तप्रवाह सुधारतो.

३. बटाट्याचा रस त्वचेला लावल्याने पिगमेंटेशन कमी होते, त्वचेतील घाण निघून जाते. eczema झालेल्यांसाठी हा रस अत्यंत गुणकारी आहे. १०-१५ दिवस बटाट्याचा रस घेतल्याने नक्कीच आराम मिळेल.

४. कोंड्यापासून सुटका मिळवण्यासाठी महागडे, ब्रँडेड शाम्पू वापरण्याऐवजी हा सोपा घरगुती उपाय करून बघा. बटाटाच्या रस स्काल्फ आणि केसांना लावा. २० मिनिटे किंवा तासाभराने केस थंड पाण्याने धुवा. यामुळे केस स्वच्छ, मजबूत आणि काळेभोर होतील. तसंच कोंड्याची समस्याही दूर होईल.

५. डोळ्यांखाली सूज व काळी वर्तुळे असल्यास ताज्या बनवलेल्या बटाट्याच्या रसात कापसाचा बोळा ओला करून डोळ्यांभोवती लावा. असे रोज केल्यास सूज व काळी वर्तुळे दूर होण्यास मदत होईल.

Comments

Popular posts from this blog

समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.

मूलगीची तक्रार - कविता

शिवजयंती तिथीप्रमाणे का ?