भारताचे ३ प्रकारचे Passport. वाचा काय आहे फरक
भारताचे ३ प्रकारचे Passport. वाचा काय आहे फरक
भारताचे ३ प्रकारचे Passport – वाचा काय आहे फरक – तुम्हाला माहीत आहे काय? भारतात तीन प्रकारचे Passportआहेत. विशेष म्हणजे या तिन्ही रंगांचे वैशिष्ट्य वेगवेगळे आहे. विना व्हिसा विदेशात जाणे शक्यच नाही. विदेशवारीसह आयडी/अॅड्रेस प्रूफसाठी देखील याचा वापर केला जातो
भारतीय पासपोर्टचा (Passport) हा जगभरातील सर्वात प्रभावशाली पासपोर्टच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. भारतीय नागरिक आता विना व्हिसा जगातील 59 देशामध्ये प्रवास करू शकतात. एका रिपोर्टनुसार, भारतीय पासपोर्टवर काही देशांमध्ये ‘व्हिसा ऑन अराइवल’ सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
निळा : सामान्य व तत्काळ, सामान्य व्यक्तीसाठी
देशातील सामान्य व्यक्तीसाठी निळ्या रंगात Passport बनवला जातो. निळा रंग भारतीय नागरिकाला रिप्रझेंट करत असतो. त्यात ऑफिशियल व डिप्लोमॅट्सपासून वेगळे ठेवत असतो. सरकारनेच हे अंतर निर्माण केले आहे. कस्टम अधिकारी तसेच विदेशात पासपोर्ट तपासणी करताना अडचणी येत नाहीत. यावर पासपोर्टधारकाचे नाव असते. जन्म तारीख, जन्म स्थळाचा उल्लेख असतो. सोबत छायाचित्र व स्वाक्षरी असते. व्यक्तीची ओळख दर्शवण्यासाठी पासपोर्टकडे महत्त्वपूर्ण पुरावा म्हणून पाहिले जाते.
पांढरा: ऑफिशियल, सरकारी कामासाठी
शासकीय अधिकारी तसेच सरकारी कामासाठी पांढर्या रंगाचा पासपोर्ट दिला जातो. सरकारी कामासाठी विदेशात जाणार्या व्यक्तीला पांढरा पासपोर्ट दिला जातो. ऑफिशियल आयडेंटिटीसाठी हा पासपोर्ट पाहिला जातो. कस्टम चेकिंग करताना याच पद्धतीने तपासणी केले जाते. पांढर्या पासपोर्टसाठी अर्जदाराला स्वतंत्र अर्ज करावा लागतो. पांढर्या पासपोर्ट मिळवण्यासाठी अर्जात ठोस कारण द्यावे लागते. पांढरा पासपोर्टधारकाला विविध सुविधा मिळत असतात.
मरून: डिप्लोमॅटिक, भारतीय डिप्लोमॅट्स व वरिष्ठ सरकारी अधिकारी
भारतीय राजनयिक (डिप्लोमॅट्स) व सरकारी वरिष्ठ अधिकार्यांना (आयपीएस, आयएएस दर्जाचे अधिकारी) मरून रंगाचा Passport दिला जातो. हाय क्वॉलिटी पासपोर्टसाठी स्वतंत्र अर्ज दिला जातो.
Comments
Post a Comment