ЁЯНЙ рдпा рдлाрдпрдж्рдпांрд╕ाрдаी рдЕрд╡рд╢्рдп рдЦा рдХрд▓िंрдЧрдб!
🍉 या फायद्यांसाठी अवश्य खा कलिंगड!
आपल्याकडे हंमागी फळे भाज्या येतात. सध्या उन्हाळा चालू आहे आणि हा हंगाम आहे कलिंगडाचा. बाजारात तुम्हाला लाल, रसदार कलिंगड पाहायला मिळतील. उन्हाळ्यात याचा आहारात भरपूर समावेश करा. कारण त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. पाहुया काय आहेत फायदे...
●कलिंगडात पोटॅशियम आणि मॅग्नेशिअम असल्याने रक्तदाब वाढत नाही. त्याचबरोबर पोटाच्या समस्याही दूर होतात.
●कलिंगड खाणाऱ्यांना हृदयासंबंधित आजार होत नाहीत, असे तज्ञांचे मत आहे. कारण कलिंगडामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहते. त्यामुळे हृदयाचे आजार होण्याचा धोका कमी होतो.
●उन्हाळ्यात ऊनामुळे त्वचा खूप खराब होते. त्यासाठी देखील कलिंगड फायदेशीर ठरते. कलिंगडात लोयकोपिन अधिक प्रमाणात आहे. त्यामुळे त्वचा चमकदार होण्यास मदत होते.
●कलिंगड खाल्याने पोट भरलेले राहते. त्यामुळे खूप वेळ काही खाल्ले जात नाही. परिणामी वजन कमी करण्यास मदत होते.
●कलिंगडात अनेक व्हिटॉमिन्स असतात. जे आरोग्यासाठी महत्त्वाचे असतात. यातील व्हिटॉमिन ए शरीराची रोगप्रतिकारकशक्ती आणि डोळ्यांसाठी उत्तम ठरते.
Comments
Post a Comment