जाणून घ्या कोणती ई-पेमेंट पद्धत केव्हा वापराल

जाणून घ्या कोणती ई-पेमेंट पद्धत केव्हा वापराल

माहिती तंत्रज्ञान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदी केल्यापासून ई व्यवहारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मागील दोन वर्षांत आपण डिजिटल व्यवहारासाठी तसेच पैसे ट्रान्सफर करण्यासाठी ई-वॉलेट्स पासून यूपीआय पर्यंत अनेक नवीन पर्याय जास्त प्रमाणात वापरात आले. मात्र यामध्ये कोणती ई-पेमेंट पद्धती कोणत्या वेळी वापरावी याचे योग्य ते ज्ञान असणे आवश्यक आहे. तरच त्याचा चांगल्या पद्धतीने फायदा होऊ शकतो. त्यामुळे या पद्धती आणि त्यांचा वापर याबाबत माहिती करुन घेऊया.

यूनिफाइड पेमेंट इंटरफेस (यूपीआय), नॅशनल इलेक्ट्रॉनिक पेमेंट ट्रांसफर (एनईएफटी), इमीजिएट पेमेंट सर्व्हिसेस (आयएमपीएस) आणि रियल टाइम ग्रॉस सेटलमेंट (आरटीजीएस) हे पैसे ट्रांसफर करण्याचे काही लोकप्रिय पर्याय आहेत. यामध्ये निरनिराळे चार्जेस, सोयी आणि ट्रान्सफरचा कालावधी असतो. यापैकी यूपीआय सर्वात जलद आणि सोपा पर्याय आहे आणि ई-वॉलेट्स आणि आधार पे याच तंत्रज्ञानावर आधारलेले आहेत. पण सर्व ठिकाणी हा पर्याय वापरता येत नाही. तसेच, कुठल्याही ई-वॉलेटमध्ये पैसे ट्रान्सफर केल्यानंतर ते परत तुमच्या खात्यात घेण्यासाठी तुम्हाला काही रक्कम आकारली जाऊ शकते. या ई-प्लॅटफॉर्मना तुलनात्मक दृष्टीने समजून घेऊया…

एनईएफटी

एनईएफटीचा वापर मोठ्या रकमेच्या ट्रान्सफरसाठी करावा, विशेषकरून सामान्य व्यावसायिक कारणांसाठी, कारण पैशाची कमाल मर्यादा इथे लागू नाही. २ लाखापेक्षा अधिक रक्कम ट्रान्सफर करण्यासाठी जास्त चार्ज आकारला जातो. एनईएफटी वापरण्यासाठी तुम्हाला फक्त ऑनलाइन व्यवहार करता येण्यासारखे बँक खाते आणि इंटरनेट यांचीच गरज असते.
मात्र, हे व्यवहार लगेच होत नाहीत आणि बँकेच्या कामाच्या दिवसांत दर ३० मिनिटाला हे व्यवहार पार पाडले जातात.

आरटीजीएस

आरटीजीएस व्यवहार फक्त २ लाखापेक्षा अधिक रकमेसाठीच केले जाऊ शकतात. आरटीजीएस लगेच पूर्ण होणारा व्यवहार आहे. याद्वारे ३० मिनिटांच्या आत दुसऱ्या पक्षाच्या बँक खात्यात पैसे जमा होतात. आरटीजीएस व्यवहार फक्त बँकांच्या कामाच्या वेळातच केले जाऊ शकतात. तसेच यासाठी दोन्ही पक्षांच्या बँक शाखा आरटीजीएससाठी सक्षम असल्या पाहिजेत.

आयएमपीएस

जर तुम्हाला लगेच पैसे ट्रान्सफर करायचे असतील, तर आयएमपीएस उत्तम पर्याय ठरू शकतो. याद्वारे पैसे लगेच, तेही कोणत्याही वेळेला ट्रान्सफर केले जाऊ शकतात. पण या पद्धतीने पैसे ट्रांसफर करण्यासाठी कमाल मर्यादा २ लाख एवढीच आहे. खाजगी आणि लहान व्यावसायिक व्यवहारांसाठी आयएमपीएस उपयुक्त आहे.

यूपीआय

यूपीआय आधारित व्यवहार मोबाइल फोनवरून करता येतात. यात तुम्ही सध्या १ लाखाइतकी रक्कम ट्रान्सफर करू शकता आणि यासाठी काहीच चार्ज लागत नाही. तुम्ही तुमच्या बँकेचे यूपीआय-सक्षम अॅप वापरूनही हे व्यवहार करू शकता. ऑनलाइन खरेदीसाठी, तसेच दुकानात, मित्रांना किंवा कुटुंबीयांना पैसे ट्रान्सफर करण्यासाठी हा पर्याय वापरला जाऊ शकतो. आयएमपीएस प्रमाणेच यूपीआय सुद्धा तुम्हाला केव्हाही व्यवहार करण्याचे स्वातंत्र्य देते. यूपीआय-आधारीत अॅपने व्यवहार केल्याने तुम्हाला सूट (डिस्काउंट) किंवा इतर ऑफर्स सुद्धा मिळू शकतात. भारत शासनाचे भीम BHIM अॅप्लिकेशन हे यूपीआय-आधारित असेच एक अॅप आहे ज्याने व्यावसायिक कारणांसाठी एका बँक खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे पाठवता येतात.

पर्याय निवडावा कसा?

सामान्य व्यावसायिक व्यवहारांसाठी सध्या आरटीजीएस, आयएमपीएस आणि एनईएफटी पर्याय उपयुक्त आहेत. ऑनलाइन खरेदी किंवा तत्सम इतर व्यवहारांसाठी यूपीआय-आधारित व्यवहार करावे कारण यात आकर्षक ऑफर्स तसेच सूट मिळते. तुमच्या खर्च करण्याच्या पद्धतीप्रमाणे पर्याय निवडा. उदाहरणार्थ, जर तुम्ही अधिक प्रवास करीत असलात, तर प्रवासातील व्यवहारांवर अधिक सूट मिळवून देणारा पर्याय निवडा. अधिक फायदे मिळवण्यासाठी तुम्ही एकापेक्षा अधिक ई-पेमेंट पर्याय वापरू शकता

Comments

Popular posts from this blog

समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.

मूलगीची तक्रार - कविता

📱Tech Knowledge : स्मार्टफोनमधील किरणोत्सर्गामुळे गर्भपाताचा धोका...