๐ เคเคจ्เคนाเคณ्เคฏाเคा เคค्เคฐाเคธ เคเคฎी เคเคฐाเคฏเคाเคฏ? เคเคฒिंเคเคก เคा, เคซ्เคฐेเคถ เคฐเคนा..!
🍉 उन्हाळ्याचा त्रास कमी करायचाय? कलिंगड खा, फ्रेश रहा..!
साधारण मार्चच्या सुरुवातीपासूनच उकाडा वाढायला सरुवात होते. डोक्यावर तळपतं ऊन आणि अंगातून निथळणारा घाम यामुळे हा उन्हाळा अगदीच नकोसा होतो. पण या उन्हाळ्यापासून बचाव करण्यासाठी एक रामबाण उपाय आहे. उन्हाळा सुरू झाला की बाजारात थंडगार कलिंगड दिसू लागतात. उन्हाळ्यात सहन कराव्या लागणाऱ्या अनेक त्रासांपासून हे कलिंगड आपला बचाव करते.
1. उन्हाळ्यात सतत तहान लागते. कलिंगड हे तृषाशामक असल्याने तहान भागवण्यासाठी आणि थंडावा मिळवण्यासाठी कलिंगड उपयुक्त ठरते.
2. हे अल्कली गुणधर्माचं फळ असल्याने, पित्ताच्या दोषांवर गुणकारी ठरते.
3. उन्हाळ्यात घामातून शरीरातील खनिजे निघून जातात, पण कलिंगड खाल्ल्याने तहान भागते व शरीरातील खनिज द्रव्यांची हानी भरून निघते आणि सूर्यकिरणांच्या थेट माऱ्यामुळे होणारे रेडिएशनचे परिणाम कमी होतात.
4. इतर फळांच्या तुलनेत कलिंगडात पाणी आणि पोटॅशियमचे प्रमाण जास्त असल्याने, उन्हाळ्यात उद्भवणाऱ्या मुत्राशयाच्या विकारांवर कलिंगडाचे सेवन लाभदायक ठरते.
5. कलिंगड हे जेवणानंतर खाणे जास्त उपयुक्त ठरते.
6. कलिंगड 78% भाग हा गराचा असल्याने ते खाद्य आणि पेय दोन्ही आहे. उन्हाळ्यात कलिंगडाइतके उत्साहवर्धक पेय दुसरे नाही.
Comments
Post a Comment