कर्ज फेडायचंय! या आहेत 10 टिप्स

🏦 कर्ज फेडायचंय! या आहेत 10 टिप्स

एखाद्याच्या आर्थिक परिस्थितीनुसार आणि आलेल्या संकाटामुळे कर्ज घेणं काही नवीन गोष्ट नाहीये. पण मग बराच वेळा कर्ज इतकं वाढतं की कर्जाचा डोंगर उभा राहतो. पण सहजरित्या कर्ज फेडण्यासाठी आम्ही तुम्हाला 10 टिप्स सांगणार आहोत.

💰 नेहमी बचत करायला शिका
असं म्हणातात की जितकं आपण कमवतो तितकाच खर्च होतो. पण मग असं झालं तर कर्ज कसं फेडणार. त्यामुळे पैशांची योग्यरित्या बचत करणं महत्त्वाचं आहे.

💰 आपले आर्थिक लक्ष्य ठरवा
आपण किती कमवतो आणि त्यातले किती पैसे खर्च होतात यानुसार आपण किती पैशांची बचत करणार याचे लक्ष्य ठरवून ठेवा.

💰 भविष्यासाठी योजना आखा
जी मंडळी आताचा विचार करून जगतात त्यांना पुढे जाऊन आर्थिक त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भविष्याचा विचार करून पैशांच्या योजना आखा.

💰 क्रेडिट कार्डचा वापर कमी करा
प्रत्येक गोष्ट लगेच पैसे देऊ खरेदी करण्याची सवय लावली की आपोआपच आपला खर्च कमी होतो. पण क्रेडिट कार्डचा वापर म्हणजे एका प्रकारे कर्ज केल्यासारखंच आहे.

💰 कंजूष बना
हो आता मान्य नसलं तरी थोडं कंजूस असावंच. कारण आपण बाजारात गेलो की दिसेल ते खरेदी करण्याच्या मूडमध्ये असतो. त्यामुळे वायफळ पैसा खर्च होतो.

💰 इमर्जन्सी फंडचं नियोजन करा
आपल्या कमाईचा काही भाग इमर्जन्सी फंडच्या स्वरुपात नेहमी सुरक्षित ठेवा. त्याने संकटकालीन परिस्थितीत कोणासमोर हात पसरण्याची वेळ येणार नाही.

💰 वस्तू घेताना भाव करायला शिका
बाजारात सामान घेत्यावेळी भाव करायला विसरू नका. त्यासाठी मार्केटमध्ये एखाद्या वस्तूला काय भाव आहेत याबद्द्ल माहित असू द्या. त्याने आपल्या पैशांची लूट होणार नाही.

💰 बँकेच्या व्यवहारावर लक्ष असू द्या
हो, अनेकदा ऑनलाईन सुविधेमुळे आपण बँकेच्या व्यवहारावर लक्ष ठेवत नाही. त्यामुळे पैशांची हेराफेरी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपल्या खर्चाचा हिशोब ठेवा.

💰 घराच्या सामानासाठी क्रेडिट कार्डचा वापर
जर तुम्ही घरात आवश्यक असलेलं सामान प्रत्येक महिन्याला विकत घेत असाल तर क्रेडिट कार्डचा वापर योग्य आहे.

💰 आपलं बजेट नेहमी फिक्स असू द्या
कर्जमुक्त व्हायचं असेल तर आपल्या कमाईनुसार आपलं घराचं आर्थिक बजेट ठरवावं लागेल. त्याने वायफळ खर्च होणार नाही.

Comments

Popular posts from this blog

समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.

मूलगीची तक्रार - कविता

📱Tech Knowledge : स्मार्टफोनमधील किरणोत्सर्गामुळे गर्भपाताचा धोका...