सारखा खोकला येतोय? ‘हे’ उपाय करुन पाहा
सारखा खोकला येतोय? ‘हे’ उपाय करुन पाहा
वातावरणात अचानक झालेल्या बदलांमुळे सध्या अनेकांना सर्दी, ताप आणि मुख्य म्हणजे खोकला होत आहे. अगदी लहानग्यांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांनाच खोकल्याचा त्रास होत आहे.अशावेळी काय करावे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर आयुर्वेदातील काही उपाय यावर उपयुक्त ठरु शकतात.
१. कफ पातळ होऊन शरीराबाहेर पडावा यासाठी दिवसभर गरम पाणी प्यावे.
२. दिवसातून ४ वेळा गरम पाण्याने गुळण्या कराव्यात.
३. गवती चहा, आलं, पारिजातकाचे १ पान, तुळशीची पाने, दालचिनी, २ मिरे, १ लवंग काढा दिवसातून २ वेळा घ्यावा.
४. पाव चमचा सितोपलादी चूर्ण मधातून चाटावे. यामुळे छातीच्या स्नायूंना ताकद मिळते व कफ मोकळा होण्यास मदत होते.
५. १ चमचा आल्याचा रस आणि १ चमचा मध असे मिश्रण दिवसातून ४ वेळा घ्यावे.
६. आहारात दही, ताक, दूध असे कफ वाढविणारे पदार्थ काही दिवस टाळावेत.
७. संत्री, पेरु अशी फळे खाणे टाळावे. या फळांमुळे आधीपासून असलेला खोकल वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे ती टाळलेलीच बरी.
८. कोरडा खोकला असेल तर काळ्या मनुका चघळून खाव्या. तसेच खडीसाखरेचा तुकडाही चघळावा. यामुळे खोकला कमी होण्यास मदत होते.
Comments
Post a Comment