या पाच देशात फिरा,पैशाची चिंता अजिबात नको!

या पाच देशात फिरा,पैशाची चिंता अजिबात नको!

व्हिएतनाम : कम्युनिस्ट चीनचा प्रभाव असलेला व्हिएतनाम. इथे राजधानी हनोई, ला लोंगची खाडी, वॉटर पपेट (पाण्याच्या अद्भुत बाहुल्या) पॅराडाईजच्या गुहा, व्हिएतनामी म्युझियम अशा अनेक ठिकाणी पर्यटकांची गर्दी असते. डोंग हे व्हिएतनामचं चलन आहे. व्हिएतनामी डोंगमध्ये एका भारतीय रूपयाची किंमत 349 रु पये इतकी होते.

कंबोडिया : या देशात गेल्यावर तुम्हाला कदाचित भारताची फारशी आठवण येणार नाही. कारण आपल्या देशासारखीच कंबोडियामध्ये अनेक मोठी-मोठी मंदिरं आहेत. जगातलं विष्णुचं सर्वांत मोठं मंदिरही कंबोडियामध्येच आहे. याशिवाय अंकोर वट, क्राती, कोहरोंग सारखी ठिकाणं आकर्षणाचं केंद्र आहेत. राईल हे कंबोडियाचं चलन आहे. एका भारतीय रूपयाची किंमत कंबोडियन राइलमध्ये 62.19 रूपये इतकी होते.

आयर्लण्ड : युरोपमधल्या आयर्लण्डमध्ये फिरण्यासाठी अनेक ठिकाणं आहेत. इथल्या स्वार्तीफोस, ब्रिडाविक बीच, आस्कजा, स्कोगाफोस, ब्लू लगून सारख्या ठिकाणांवर तुम्हाला अगदी स्वर्ग धरतीवर अवतरल्याचा अनुभव येईल. क्रोना हे आयर्लण्डचं चलन आहे. त्याच्याशी तुलना केली तर भारताच्या एका रूपयाची किंमत क्रोनामध्ये 1.60 रु पये इतकी होते.

श्रीलंकेत भारतातील एक रुपया म्हणजे 2.38 श्रीलंकन रुपया आहे. भारतापासून अत्यंत जवळ असणा-या श्रीलंकेतील निसर्गसौंदर्य पाहण्यासारखं आहे. येथील समुद्र किनारे, डोंगरद-या, हिरवळ आणि ऐतिहासिक स्मारके मुख्य आकर्षण आहे.

नेपाळमध्ये भारतीय एक रुपयाची किंमत 1.60 नेपाळी रुपया इतकी आहे. येथे जाण्यासाठी आपल्याला व्हिसाची गरज लागत नाही.

हंगरीत भारतीय एक रुपया म्हणजे 3.99 हंगेरीयाई फ़ॉरिंट आहे. हंगरीची वास्तुकला आणि संस्कृती अतिक्षय लोकप्रिय आहे. हंगरीची राजधानी बुद्धापेस्ट जगातील सर्वात रोमांटिक शहरापैकी एक आहे. परदेशवारी करायची असेल तर येथे नक्की जा. येथे जाण्यासाठी खिसा जड असण्याची गरज नाही.

जापानमध्ये भारतीय एक रुपया म्हणजे 1.70 जपानी येन आहे. शिस्त आणि मेहनतीसोबत आपल्या संस्कृतीसाठी जापान प्रसिद्द आहे. तेथील प्रगत तंत्रज्ञानाचे अविष्कार पाहण्याजोगे आहेत.

चिली येथे भारतीय एक रुपयाची किंमत 9.64 चिली पेसो आहे. जंगल आणि ट्रेकचा आनंद घेण्यासाठी चिली अत्यंत सुंदर ठिकाण आहे. चिलीमध्ये शेती, नदी, डोंगरद-या अत्यंत आकर्षक आहेत.

कोस्टा-रिका येथे भारतीय रुपयाची किंमत 9.03 कोस्टा रिकन कोलोन इतकी आहे. हा देश मध्य अमेरिका स्थित आहे. ज्वालामुखी, जंगले आणि वन्यजीव हे येथील प्रमुख आकर्षण आहे.

पेराग्वे येथे भारतीय एक रुपया म्हणजे 88.48 पैरागुएआन गुआरानी इतकी आहे. पेराग्वे दक्षिण अमेरिकामध्ये स्थित आहे. पेराग्वेमध्ये नैसर्गिक आणि भौतिकवाद यांचे मिश्रण पाहण्यास मिळते.

Comments

Popular posts from this blog

समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.

मूलगीची तक्रार - कविता

📱Tech Knowledge : स्मार्टफोनमधील किरणोत्सर्गामुळे गर्भपाताचा धोका...