हनिमून टूर्सला परदेशात जायचं असेल तर प्रश्नांचा कागद घेऊन फिरत बसू नका थेट ड्रीम वर्ल्ड टूर्सला भेट द्या!

हनिमून टूर्सला परदेशात जायचं असेल तर प्रश्नांचा कागद घेऊन फिरत बसू नका थेट ड्रीम वर्ल्ड टूर्सला भेट द्या!

नमस्कार…
मी सचिन दिलीप चौधरी. वय वर्षे पंचवीस, मु.पो.अमळनेर, जि.जळगाव. गेल्या पाच वर्षापासून पुण्यातल्या एका सोलार सिस्टिम्स नामांकित कंपनीत मॅनेजर ह्या पदावर कार्यरत आहे. खरंतर लहान पाणापासून मला बाहेर फिरायला जाण किवा एखाद्या कार्यक्रमाला जाणं या पेक्षा घर आणि पुस्तक यात रमायला फार आवडायचं. त्यातच माझा स्वभाव मुळात शांत आणि लाजरा असल्या मुळे उगाचच बोलणं ही कमीच. पण गंमत अशी झाली कि गेल्या काही वर्षां पासून मी कंपनीच्या कामा निमित्त साईटवर असतो त्यामुळे सतत बाहेर फिरणं. नवीन नवीन माणसांना भेटणं. बाहेरच मुक्काम करणं. दुसऱ्या मुलुखातल्या जीवनमानाशी जुळवून घेणं हे होत राहीलं, शिवाय मित्र मंडळी अशी भेटली कि गप्पा आणि लॉंग ड्राईव चे पक्के शौकीन. त्यामुळे नवीन नवीन माणसं वाचणं आणि निसर्गात रमणं हा माझा आवडता छंद झाला. आणि सहली करणं हा आयुष्याचा एक अविभाज्य भागाचं होऊन गेला. मग काय एक एक करून आम्ही अख्खा महाराष्ट्र आणि गड किल्ले, लेण्या, पुरातन मंदिरं कधी पिंजून काढली हे कळलंच नाही. पुढे आनंदाची गोष्ट म्हणजे आयुष्याचा जोडीदार म्हणून जिच्याशी लग्न ठरलं ती सुद्धा माझ्याप्रमाणे पुण्यात जॉब ला आणि योगायोग म्हणजे तिला सुद्धा पर्यटनाची खूप आवडं. मग काय सुत तंतोतंत जुळलं. लग्नाची तयारी घरातून सुरु झाली होती. आम्ही दोघांनीही कामावरून एक्स्ट्रा सुट्टी घेतली. कारण लग्ना नंतर हनिमूनला जायचं होतं. खरंतर कारणं हनिमूनच असलं तरी या पूर्वी कधीही न पाहिलेल्या छान निसर्गरंम्य ठिकाणी जायचं आणि ते ही परदेशात अशी दोघांचीही इच्छा होती. पण नक्की कुठे जायचं आणि कसं हे कोडं काही सुटत नव्हतं. त्यात तयारी करायला जास्त वेळही नव्हता. शिवाय पत्नीला घेऊन एका अनोळखी देशात जायचं, त्यामुळे सर्व काही सुरळीत होईल का? प्रवासात काही अडचण तर येणार नाही ना? असेही प्रश्न मनाला शिवून जात होते. पण इच्छाशक्ती प्रबळ होती म्हणून काहीही करून जायचं हे ठरवलं. मग मी जवळच्या मित्रांकडून आणि नेट च्या माध्यमातून अनेक नामांकित कॉर्पोरेट टूर्स कंपन्यांचे नंबर मिळवले. त्यांची प्रत्यक्ष भेट घेतली. त्यांचे पॅकेजेस चेक केले. त्यांनी सुचवलेल वेगवेगळे देश आणि अव्वाच्या सव्वा बजेट पाहून मी गोंधळून गेलो. शिवाय उत्तरांपेक्षा त्यांची प्रश्नावली पाहून डोकं गरगरायला लागलं. काय कराव? कसं कराव? कुठे जावं? सुचत नव्हतं. योग्य मार्गदर्शन करेल आशी व्यक्ती भेटत नव्हती. त्यामुळे अनेक प्रश्न मनात अनुत्तरीतच होते. शिवाय इकडे सुट्टीचे दिवस संपत चालले होते. शेवटी नाईलाजाने त्यातला एखादा पर्याय निवडून मी पैसे भरणार, तोच आमच्या कंपनीचे डिरेक्टर श्री. कमलाकर सरांनी मला फोन करून बाली ह्या देशात जाण्याचा पर्याय सुचवला कारण ते स्वतः ह्या देशात जाऊन आले होते. शिवाय त्यांनी ड्रीम वर्ल्ड टूर्स कंपनीचे नावही सुचवलं आणि त्या कंपनीचे मालक परेश वामनराव गायकवाड यांचाही नंबर दिला. मग आधी मी बाली ह्या देशाची नेटवर माहिती मिळवली, व्हिडीओ पहिले. आणि पाहता क्षणीच मनातून हुंकार आला कि हाच तो स्वर्ग आणि हेच ते स्वप्नरंजीत ठिकाण जिथे आमच्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत. अथांग निळ्या समुद्राच्या मधोमध हिरवी गार चादर ओढून टुमदार पणे वसलेलं छोटसं बेट म्हणजे बाली. जिथले समुद्र बीच, स्टार हॉटेल्स, ग्रीनरी, हँडमेड वस्तूंची शॉपिंग ह्या साऱ्या गोष्टी आम्ही तुमची वाट पाहतोय असं म्हणत मला खुणावत होत्या. मग काय बाली आता पहायचच हे पक्कं ठरवलं. परंतु ड्रीम वर्ल्ड बद्दल मनात शंका होती कारण मित्रांनी इतर नामांकित कंपन्याचा ब्रँड अनेकवेळा कानांवर रुजवला होता. पण मला आमच्या सरांवर विश्वास होता त्यामुळे कोणताही विचार नं करता मी परेश सरांना फोन केला. त्यांच्याशी फोन वर बोलल्यावर मला विश्वासच बसला नाही कि मी ड्रीम वर्ल्ड टूर्स च्या मालकांबरोबर म्हणजे परेश सरांन बरोबर बोलत आहे. कारण खूप संयमाने त्यांनी आधी मला काय हवंय हे समजून घेतलं त्या नंतर कशा पद्धतीने पुढे जाता येईल हे समजून सांगितलं. स्वतः बालीला अनेक फॅमिली टूर्स केलेल्या होत्या त्यामुळे अनुभवातून सर्वसामान्य फॅमिलीला किवा जोडप्यांना योग्य खर्चात जास्तीत जास्त सहलीचा आनंद कसा घेता येईल हे पटवून दिलं. खरंतर त्यांच्याशी बोलल्यानंतर डोक्यावरचं खूप मोठा ओझ कमी झाल्यासाख वाटलं. आणि आपण ज्या योग्य माणसाच्या शोधात होतो ती व्यक्ती भेटली असचं वाटलं. त्यानंतर परेश सरांना त्यांच्या ऑफिस मध्ये प्रत्यक्ष भेटल्या नंतर त्यांचा बोलण्यातला साधेपणा, खरेपणा, शिस्त, अभ्यास आणि फक्त आपल्या माणसांनी परदेशात फिरायला जावं ह्या तळमळीपोटी करत असलेला हा व्यवसाय ह्या गोष्टीनी मला खूप इम्प्रेस केलं. शिवाय सरांनी मला त्यानंरही विचार करायला दोन दिवस दिले. त्या दरम्यान मी त्यांना कोणतीही शंका आली कि मेसेज करून विचारायचो आणि ते तत्परतेने उत्तर द्यायचे. माझ्या शंकेच निरसन करताना त्यांनी कोणतीही टाळाटाळ केली नाही आणि कोणतेही नकारात्मक विचार माझ्या डोक्यात येऊ दिले नाही. मग काय कोणत्याही ब्रँडच्या मागे न धावता आता फक्त ड्रीम वर्ल्ड टूर्स बरोबरच बालीला जायच हा निर्णय पक्का झाला. मी वयक्तिक पाच दिवसांचे पॅकेज घेतले होते. त्यामुळे सर आमच्या बरोबर नसणार, पण सतत ऑनलाईन असल्यामुळे ते नकळत आमच्या संपर्कात असणार हे माहित होतं. प्रत्येकाची खाण्याची वेळ वेगवेगळी असते म्हणून लंच आणि डिनर आम्ही स्वतःकडे घेतलं होतं. खरंतर “परदेशात जाण्याच स्वप्न तुमचं, ते पूर्ण करण्याच ध्येय आमचं.” हे ड्रीम वर्ल्ड च ब्रीदवाक्य त्यांना साजेसं आहे कारण योग्य बजेट मध्ये आम्हाला दर्जेदार सर्विस देणारं पॅकेज परेश सरांनी दिलं. शिवाय आमच्या कामाची जबाबदारीही त्यांनी स्वतःच्या खांद्यावर घेऊन खूप कमी दिवसात सर्व कागदपत्रांची पूर्तता करून पासपोर्ट, विमानाची तिकिटे आमच्या हातात सुफुर्द केली. खरंतर मी आणि माझी पत्नी आम्हा दोघांसाठी विमानाचा आणि परदेशाचा प्रवास पहिला होता त्यामुळे अगदी प्लेन मध्ये बसे पर्यंत मित्रांनी, घरातल्यांनी काही अडचण आली तर फोन करा. तुम्हाला घ्यायला येतील ना एअरपोर्ट वर कोणी ? हॉटेल केलय ना बुक बरोबर ? अशा अनेक ड्रीम वर्ल्डच्या नियोजना बद्दल शंका कुशंका काढणारे प्रश्न केले. पण मला परेश सरांवर द्रुढ विश्वास होता. कारण ट्रीपला जाण्यापूर्वी सरांनी मला ऑफिसला बोलावून सर्व टूर्सचा प्रवास समजवून सांगितला होता. संपर्कासाठी तिथल्या माणसांचेही नंबर शेयर केले होते. करंसी एक्सेंज करण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली होती. शिवाय मी इथे असलो तरी फोन द्वारे सतत तुमच्या संपर्कात आहे आणि माझी माणसं तुमच्या नियोजनासाठी बाली मध्ये सज्ज आहेत हे त्यांनी ठासून सांगितलं होतं. आणि पुढे झालंही त्यांनी सांगितल्या प्रमाणे किबहुना त्यापेक्षा अधिक. विमानाचा प्रवास तर अविस्मरणीय झालाच. पण बाली एअरपोर्ट वर उतरल्यावर आमच्या सोबत एक अनपेक्षित घटना घडली. एक लेडी अटेंडट आमच्या नावाचा बोर्ड घेऊन वाट पाहत उभी होती. जवळच एक अलिशान गाडी आणि हॉटेल्स चे काही कर्मचारी आम्हांला घेऊन जाण्यासाठी सज्ज होते. बाहेर येताच त्यांनी आमच स्वागत टाळ्या वाजवून आणि सुंदर फुलांचा हार आमच्या गळ्यात घालून केलं. आम्ही कोणीतरी सेलिब्रेटी आहोत ह्या पद्धतीने त्यांनी आमचा पाहुणचार केला. हे पाहून मी इतका भारावून गेलो कि ह्याच क्षणाला आमचं लग्न झालंय असं वाटलं. सरांनी सारं नियोजन अगदी तंतोतंत केलं होतं. कोणालाही काही सांगायची गरज लागत नव्हती. आम्हाला अतिशय आदराने ते अलिशान गाडीतून तारांकित हॉटेल्समध्ये घेऊन आले. हॉटेल आणि तिथली सर्विस पाहून खूप आनंद झाला. त्या दिवशी आम्ही आराम केला कारण बारा तासांच्या प्रवासा नंतर आम्ही थोडे थकलो होतो. दुसऱ्या दिवशी आम्ही लवकर उठलो ब्रेकफास्ट केला. बाहेर एक अलिशान चारचाकी कार, आणि अंगात युनिफॉर्म घातलेला ड्रायवर आमची फिरायला जाण्यासाठी वाट पाहत उभे होते. परेश सरांनी आम्हाला दिलेला ड्रायवर अगदी ऑलराउंडर होता. कारण तोच आमचा पुढच्या प्रवासातला गाईड होता. शिवाय तो इंडोनेशियाचा असला तरी छानपैकी इंग्रजी समजणारा आणि बोलणारा होता. स्वभावाने अतिशय शांत आणि हसमुख होता. परेश सरांचं नियोजन पाहून मी निश्चिंत झालो आणि आता पुढचे चार दिवस फक्त धमाल करायची असं मनोमन ठरवू लागलो. आणि झालंही तसचं आम्ही उबुद आणि सेलुक विलेजच्या शॉपिंग पासून सुरवात केली. लाकडापासून बनवलेल्या हँडमेड वस्तू पाहून नयन तृप्त झाले. मनुष्य इतकी उत्कृष्ट कलाकृती हाताने तयार करू शकतो ह्या वर विश्वास बसत नव्हता. त्यानंतर आम्ही किंतामनी वोल्कॅनो ला गेलो परंतु प्रचंड धुक्या मुळे आम्ही ज्वालामुखी पाहू शकलो नाही. लुवा कॉफीची मजा तर मनमुराद घेतली. आम्हाला ती इतकी आवडली कि बारा प्रकारचे फ्लेवर आम्ही ट्राय केले. सर्व काही अपेक्षा ठेवली होती त्या पेक्षा जास्त सुखात्मक असा अनुभव देतं होत. गकिक येथे डोळे स्तब्ध करून टाकणारे मोठमोठे दगडाचे स्टॅच्यू पहिल्या, उलुवातु मंदिर पाहून मनाला खूप अध्यात्मिक समाधान वाटलं तिथल्या समुद्राच्या लाटांचा आस्वाद घेताना आम्ही खूप साऱ्या सेल्फी काढल्या. निसर्ग आणि माणूस यांच्या अप्रतिम कलाकृतीची जुगलबंदी दिवसभर डोळ्यात साठ्वल्यानंतर रात्री कँडल लाईट डिनर तेही भारतीय जेवणा बरोबर हा अनुभव खरच अद्वितीय होता. तिथल्या बाली ड्रीम व्हिलाची तर बातच न्यारी ते पाहून असं वाटलं कि हे ड्रीम आहे कि सत्यता. तिथल मोस्ट फेवरेट तनाह लॉट टेम्पल सनसेट कमाल होता. मला नाही वाटत कि मावळणारा सूर्य इतका सुंदर पृथ्वीवर इतर कुठून दिसत असेल. तिथल्या मसाज सेंटर मधला अनुभव हा देखील शब्दाच्या पलीकडचा होता. निसर्ग, संस्कृती, सौंदर्य, जेवण, भाषा, माणुसकी हे पाहत असताना पावलोपावली वाटत होत कि देवाने बाली ह्या देशाला झुकत मापच दिलं. किंवा स्वर्ग नावाची संकल्पना सत्य असेल तर तो बालीच असेल. असो हा सर्व अनुभव स्वप्नवत असला तरी फोटोग्राफी आणि मेमरी च्या माध्यमातून आम्ही तो जपून ठेवला. आयुष्यातले पाच दिवस निसर्गाच्या कुशीत घालवले. त्यामुळे नक्कीच भावी आयुष्यातल्या सुखी संसाराची सुरवातही सकारात्मक उर्जे ने झाली ह्या गोष्टीच समाधान आयुष्यभर राहील. आणि ह्या सर्वांच श्रेय जातं ते म्हणजे माय मोस्ट फेवरेट ड्रीम वर्ल्ड टूर्सला अर्थात परेश सरांना. ह्या सहलीने आम्हाला अनेक गोष्टी दिल्या पण त्यात सर्वात महत्वाच म्हणजे परेश सरांसारखा दिलदार मित्र दिला. ते माझ्या पेक्षा वयाने मोठे असतील परंतु एका मित्रा प्रमाणे त्यांनी मला समजून घेतलं आणि माझं स्वप्न पूर्ण करायला मदतीचा हात दिला. परदेशातल्या पूर्ण प्रवासात ते स्वतः फोन करून आमची विचारपूस करत होते. आम्ही जेवणाच नियोजन स्वतःकडे ठेवलं होतं. त्यामुळे तिथे फिरत असताना आम्हाला भारतीय जेवण नक्की कुठे भेटेल हे कळत नव्हतं अशावेळी परेश सरांना फक्त एक मेसेज केला आणि त्यांनी क्षणाचाही विलंब न करता कोणतं हॉटेल, कस जायचं काय मागवायच हे डिटेल मध्ये सांगितलं. खरच त्यांच्या ह्या डेडिकेशन बद्दल बोलावं तेवधाम कमीच आहे. आम्ही ड्रीम वर्ल्ड टूर्स चे फॅमेली मेंम्बर झालो आहोत हे सांगायला आणि इतरांनाही ड्रीम वर्ल्डच नाव हक्काने सुचवायला मला खूप अभिमान वाटतो. शिवाय नवीन लग्न झालेल्यांना तर मी आवर्जून सांगतो हनिमून टूर्सला परदेशात जायचं असेल तर प्रश्नांचा कागद घेऊन फिरत बसू नका. थेट ड्रीम वर्ल्ड टूर्सला भेट द्या!

http://dreamworldtours.in/

Comments

Popular posts from this blog

समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.

मूलगीची तक्रार - कविता

📱Tech Knowledge : स्मार्टफोनमधील किरणोत्सर्गामुळे गर्भपाताचा धोका...