अँड्रोईड स्मार्टफोन लॉक झालाय? डोन्ट वरी… ही ट्रिक वापरा डेटा न गमावता फोन पूर्ववत करा!

अँड्रोईड स्मार्टफोन लॉक झालाय? डोन्ट वरी… ही ट्रिक वापरा डेटा न गमावता फोन पूर्ववत करा!

अँड्रोईड स्मार्टफोन वापरताना बहुतेक सर्वच जण पॅटर्न लॉक किंवा पासवर्ड ठेवतात, जेणेकरून आपल्या स्मार्टफोनशी आपल्या व्यतिरिक्त इतर कोणीही चाळे करू नयेत. पण कधी कधी हाच सुरक्षा उपाय आपल्या अंगाशी येतो आणि आपण पॅटर्न लॉक किंवा पासवर्ड विसरून जातो. मग काय? बोंबलत फिरण्यशिवाय दुसरा उपाय नाही. अश्या वेळी दोन पर्याय उपलब्ध असतात- एकतर Factory Data Reset हा पर्याय वापरून स्मार्टफोनमधील सर्व data हरवून बसा किंवा मोबाईल दुकानात जाऊन त्याला २००-५०० रुपये देऊन पॅटर्न लॉक किंवा पासवर्ड अनलॉक करा. पण कधीकधी हे दोन्ही मार्ग अवलंबणे परवडत नाही.

जर तुम्ही देखील कधी अश्या परिस्थितीमध्ये फसलात आणि या दोन्ही मार्गांचा अवलंब करायचा नसेल तर आज आम्ही सांगतोय ती पद्धत वापरा. म्हणजे तुमचा data, मोबाईल आणि पैसा तिन्ही गोष्टी वाचतील.

जर कधी स्मार्टफोनचा पॅटर्न लॉक किंवा पासवर्ड विसरलात तर सर्वप्रथम एका मेमरी कार्डची आणि स्मार्टफोनची सोय करायची.

या दुसऱ्या स्मार्टफोनमध्ये हे मेमेरी कार्ड insert करायचं. नंतर या स्मार्टफोन मधून Aroma File Manager हे अॅप्पलिकेशन डाउनलोड करावे. डाउनलोड करून झाल्यावर हे अॅप्पलिकेशन मेमोरी कार्ड मध्ये move करावं किंवा कॉम्प्यूटर मधून डाउनलोड करून ते नंतर मेमोरी कार्ड मध्ये move केलं तरी चालेलं.

त्यानंतर हे मेमोरी कार्ड त्या स्मार्टफोनमधून काढून तुमच्या locked झालेल्या (ज्याचा पॅटर्न लॉक किंवा पासवर्ड तुम्ही विसरला आहात) स्मार्टफोनमध्ये insert करा.

यानंतर तुमच्या locked झालेल्या स्मार्टफोनची Power Key आणि Volume up key एकाच वेळी दाबून Recovery Mode ओपन करा. Recovery Mode ओपन करण्यासाठी प्रत्येक फोनचे Key Combination वेगवेगळे असतात.

या Recovery Mode मध्ये गेल्यावर Volume up आणी Volume down या बटनांच्या सहाय्याने Install Zip from SD Card या पर्यायावर यावे, हा पर्याय select करण्यासाठी मोबाईलचे मधले बटण दाबावे.

Install Zip from SD Card पर्याय निवडल्यावर SD कार्ड मधून Aroma File Manager चा path निवडून ते install करावे.

Aroma File Manager अॅप्पलिकेशन install झाल्यावर ते पुन्हा Recovery Mode मध्ये ओपन होईल.

या Aroma File Manager मधून settings मध्ये जावे, त्यात तुम्हाला सर्वात शेवटी Automount all devices on start हा पर्याय दिसेल. त्या या पर्यायावर क्लिक करा आणि exit करा.

आता पुन्हा Install Zip from SD Card या पर्यायावर यावे, हा पर्याय select करण्यासाठी मोबाईलचे मधले बटण दाबावे.
Install Zip from SD Card पर्याय निवडल्यावर SD कार्ड मधून Aroma File Manager चा path निवडून ते install करावे. Aroma File Manager अॅप्पलिकेशन install झाल्यावर ते पुन्हा Recovery Mode मध्ये ओपन होईल.

आता Data Folder या पर्याया मधील System Folde या पर्यायामध्ये जाऊन gesture.key किंवा password.key या फाइल्स शोधा.

यापैकी जी फाईल तुम्हाला दिसेल ती delete करा आणि exit करून तुमचा स्मार्टफोन reboot करा. reboot झाल्यानंतर तुमचा स्मार्टफोन सुरु होईल आणि पुन्हा तुम्हाला पॅटर्न लॉक किंवा पासवर्ड विचारेल. तेव्हा जुना पॅटर्न लॉक किंवा पासवर्ड न टाकता एखादा नवीन पॅटर्न लॉक किंवा पासवर्ड enter करा आणि तुमचा अँड्रोईड स्मार्टफोन सुरु होईल.

पण यावेळेस मात्र तुम्ही जो नवीन पॅटर्न लॉक किंवा पासवर्ड टाकलं तो विसरू नका. नाहीतर या सगळ्या विधी नव्याने कराव्या लागतील.

Comments

Popular posts from this blog

समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.

मूलगीची तक्रार - कविता

📱Tech Knowledge : स्मार्टफोनमधील किरणोत्सर्गामुळे गर्भपाताचा धोका...