मासिकपाळी कि मानसिकपाळी??
मासिकपाळी कि मानसिकपाळी??
आज खरचं अभिमान वाटला स्वताच्या स्त्री असण्याचा..कारण इतके दिवस कारण माहित नसतानाही जी बंधन आम्ही पाळत होतो , त्यातुन आम्ही आमची सुटका करुन घेतली.. आणि यासाठी आम्हाला मदत केली महाराष्ट्राचा #padman स्वप्नील शिरसेकर दादा आणि stepup foundation ने.. हे सर्व बोल दादाचेच आहेत.. फक्त त्यांना लिखीत स्वरूपात तुमच्या पर्यंत पोहोचवण्याच काम मी केलय.. आवडलंतर नक्की तुमच्या बहिणींपर्यंय देखील पोहोचवा.
ही आमच्या मासिक पाळीतील बंधन नव्हेत बरंका तर आमच्या आणि या समाजाने आमच्यावर लादलेल्या मानसिकपाळीतील बंधन..
बंधन क्रमांक १:-
मासिकपाळीत देवाला शिवू नये?????
Grammatical mistake नाहीये मी मुद्दामच ? वापरलयं.. मासिकपाळीच्या दिवसांत देवाला शिवू नकोस असं आई आजी ठणकाऊन सांगतात..
पण का शिवू नये याच satisfactory answer त्यांनी कधी दिलचं नाही..
का तर म्हणे देवाला चालत नाही.. आम्ही तर देवाचीच मुल आहोत ना? मग आमच्या त्रासाच्या दिवसात तो आम्हाला दूर करेल का?
शाळा हे सुद्धा विद्देच मंदिरच आहे ना.. मग आम्ही या मंदिरात कसं काय येतो??
मासिकपाळीच्या दिवसांत स्त्री अशुद्ध असते अस म्हणतात.. पण याच स्त्रीचं ९ महिन्यातलं मासिक पाळीच्या अशुद्ध रक्तातुन जन्म घेतलेल बाळ शुद्ध की अशुद्ध ?? त्या वेळी जन्मलेल्या बाळाला हातात घेऊन आजी म्हणते का या अशुद्ध बाळाचे डोळे आईसारखे आहेत किंवा या अशुद्ध बाळाचे नाक बाबांसारखे आहेत? नाही ना?
ज्या रक्तात फक्त दोन बीजांपासून एक जीव निर्माण करण्याची क्षमता आहे ते रक्त अशुद्ध कस काय असेल हो ??
मग देवाला न शिवण्यामागचं कारणं तरी काय?
कारण असं कि पुर्वीच्या काळी प्रत्येक घरात वेगळ देवघर असे.. त्या काळी sanitary namkins किंवा pads नव्हते . तेव्हा कपड्याचे तुकडे वापरले जायचे जे दर दोन तासाने बदलावे लागत.. जेव्हा मासिकपाळी असणारी आपली छोटीशी बहीण त्या देवघरात जायची किंवा बाहेरच्या मंदिरात जायची तेव्हा तिच्या शुद्ध रक्ताचे काही थेंब त्या देवघरातल्या जमिनीवर पडायचे .. त्यामुळे तिथल्या पुजार्यांना पुन्हा पुन्हा ती जमीन स्वच्छ करावी लागायची म्हणुन त्यांनी महीलांना विनंती केली की ताई हे दोन चार दिवस तु मंदिरात येऊ नकोस. मला पुन्हा पुन्हा स्वच्छता करावी लागते .. म्हणुन तेव्हापासून महिलांनी दोन दिवस मंदिरात जाण बंद केले.. पण आज ही परिस्थिती नाही.. मग आजही आम्हाला मंदिरात जायची बंदी का??
बंधन क्रमांक २:-
मासिक पाळीच्या दिवसात बाहेर का जाऊ नये?
याच कारण असं की पुर्वीच्या काळी आतासारखी परिस्थिती नव्हती . त्यावेळी कुठे जायचं असेल तर जंगल पार करुन जाव लागत असे.. अशावेळी जर त्या स्त्री च्या रक्ताचे थेंब जर कुठे पडले तर त्याचा वासाने जंगली जनावरांच्या हल्ल्यची शक्यता होती म्हणून अशा स्त्री ला बाहेर जाण्यापासून अडवलं जायचं..
पण आता तर जंगल नाहीत मग अजूनही हे बंधन का??
बंधन क्रमांक ३:-
मासिकपाळीतल्या स्त्रीने तुळशी ला पाणी घालु नये..
कारण काय तर तुळस सुकते..
असचं जर असतं तर रस्ते रुंदीकरणाच्या वेळी झाडे कापण्या ऐवजी मासिकपाळी असलेल्या स्त्रीला झाडाला मिठी मारायला सांगितले पाहिजे . बरोबर ना?
Japan सारख्या देशात oraganic farming साठी मासिकपाळीतल रक्त वापरलं जातय. एका स्त्री च्या स्पर्शाने झाड कस जळेल??
याच कारण ही पुर्वीच्या काळात ल आहे.. त्यावेळी तुळशी वृंदावन अंगणात असायचं.. ते अंगण रोज शेणानं सारवलं जायचं . त्यामुळे अशा जमिनीवर घसरुन पडण्याची शक्यता असायची आणि मासिकपाळीच्या त्रासाबरोबर हा त्रास वाढायचा.. म्हणुन तुळशी जवळ जाऊ नये असा निर्बंध घालण्यात आला ..
बंधन क्रमांक ४:-
लोंचे-पापड-मसाल्याला हात लाऊ नये.
कारण काय तर ते खराब होतात ..खरचं अस होत असेल का हो?
Dmart मधल्या लोंचे पापडांच्या पाकिटावर अस लिहिलेलं असत का "मासिकपाळीतल्या स्त्रियांनी हे पापड लापलेले नाहीत किंवा त्याला हात लावला नाही " ??
मग का बर हात नाही लावायचा आम्ही??
याच खरं कारण असं की मासिक पाळीच्या दिवसात बीजांड गर्भाशयातुन बाहेर येत असतं त्यामुळे गर्भाशयाच तोंड थोडस उघडलेल असतं.. आपण घाल्लेल लोंण, पापड किंवा तेलकट आणि मसालेदार पदार्थ गर्भाशयात जाण्याची शक्यता असते. त्यामुळे आपल्याला पोटदुखी चा त्रास होऊ शकतो.. आता हे पदार्थ खाऊ नका असं सांगितलं तर आपण काही ऐकणार नाही.. चोरून का होईना खाणार.. म्हणुन हातचं लावू नये असा नियम लावला गेला.. आणि लावलाच तर ते खराब होईल याची भिती घालण्यात आली...
बंधन क्रमांक ५:-
४-५ दिवशी डोक्यावरून अंघोळ करावी.
याच कारण असं की आपल्या शरीरातुन जेव्हा काहीतरी बाहेर उत्सर्गित होत तेव्हा आपल्या शरीराचं तापमान वाढतं.. त्यामुळे हे तापमान कमी करण्यासाठी डोक्यावरून अंघोळ करावी लागते..
अशी खुप सारी बंधन आहेत आमच्यावर.. पण आता नाहि .. आता वेळ आहे त्या प्रत्येक बंधनाला का? हा प्रश्न विचारण्याची ..
कोल्हापूर च्या एका चौथीतल्या मुलीन शाळेच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली.. कारण काय होत माहितेय? तिला मासिकपाळी आल्यामुळे तिच्या वर्गातील मुलं तिला चिडवत होती..
आम्ही खरचं लाज बाळगली पाहिजे का आमच्या मुलगी असण्याची???
का या विषयावर कधी आपले बाबा आपल्याशी बोलु शकत नाहीत. का आपला भाऊ अशावेळी आपली मदत करू शकत नाही??
मासिकपाळी येण खरचं येवढी लाजिरवाणी गोष्ट आहे का???
विचार करा जर ही मासिकपाळी येणचं जर बंद झाल तर... होईल का जन्म ऊद्धाच्या पिढीचा..
आठवडाभर रक्त वाहुन सुद्धा जिवंत राहणं साधी गोष्ट नाही... मुलांनो जर तुम्ही आम्हाला आधार नाही देऊ शकत तर निदान आमचि खिल्ली तरी उडवु नका....
आणि आमची मासिकपाळी जर श्राप आहे
तर ऊदया तुमचं "बाप " होण सुद्धा "पाप" आहे...
Comments
Post a Comment